गांधींनीच सावरकरांना माफिनाफा द्यायला सांगितला होता ? ‘या’ इतिहासकाराने दिलेत पुरावे

नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उदय माहूरकर यांच्या ‘Savarkar: The Man Who Could Have Prevented Partition’ या पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावली. त्यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, महात्मा गांधींनी वीर सावरकरांना ब्रिटिशांना दया याचिका लिहिण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर देशभरातून राजनाथ सिंह यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

आता या वादात ज्येष्ठ लेखक आणि वीर सावरकरांवर व्यापक संशोधन केल्यानंतर दोन पुस्तके लिहिणारे विक्रम संपत यांनी देखील उडी घेतली आहे. विक्रम संपत यांनी महात्मा गांधींनी 26 मे 1920 रोजी ‘यंग इंडिया’ मधील एका लेखाद्वारे सावरकर बंधूंना ब्रिटिशांना दया याचिका सादर करण्यास सांगितले होते याची माहिती दिली आहे. संपत यांनी त्यांच्या ‘Savarkar (Part 1): Echoes from a Forgotten Past, 1883–1924‘ या पुस्तकातही याबद्दल लिहिले आहे.

त्याचं झालं असं होतं की, 18 जानेवारी 1920 रोजी विनायक दामोदर सावरकर यांचे बंधू नारायणराव यांनी महात्मा गांधींना पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला, जे विचारधारेच्या दृष्टीने विरुद्ध ध्रुवावर उभे होते आणि त्या वेळी देशाचा एक मोठा नेता म्हणून वेगाने उदयास येत होते . नारायणरावांनी त्याच्या दोन मोठ्या भावांची सुटका करण्यासाठी त्यांची मदत आणि सल्ला मागितला. त्यांनी लिहिले की, सावरकर बंधूंची नावे सरकारने सोडलेल्या कैद्यांच्या यादीत नाहीत.

त्यांनी या पत्रात लिहिले की त्यांचा भाऊ कसा अस्वस्थ आहे आणि त्याचे वजन देखील खूप कमी झाले आहे. महात्मा गांधींनी या पत्राच्या उत्तरात लिहले की ते या प्रकरणात फार काही करू शकत नाहीत. पण, २६ मे १९२० रोजी ‘यंग इंडिया’मध्ये’ एक लेख आला ज्याचं नाव होतं ‘सावरकर बंधू’ ज्यात महात्मा गांधींनी लिहिले होते की, व्ही.डी सावरकरांनी हिंसा कशी केली नाही, त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींचा मृत्यू झाला होता.

संपत आपल्या पुस्तकात पुढे स्पष्ट करतात की या पत्राच्या एका आठवड्यानंतर म्हणजेच 25 जानेवारी 1920 रोजी गांधीजींचे उत्तर आले, जे अपेक्षेप्रमाणे होते. गांधीजींनी उत्तर दिले की ते या संदर्भात फार कमी मदत करू शकतात. त्यांनी लिहिले- ‘प्रिय डॉ. सावरकर, मला तुमचे पत्र मिळाले आहे. मला तुम्हाला सल्ला देणे कठीण वाटत आहे. तरीसुद्धा, मी सुचवू इच्छितो की तुम्ही एक छोटी याचिका तयार केली पाहिजे, ज्यात तुमच्या भावांनी केलेला गुन्हा पूर्णपणे राजकीय होता, असे या प्रकरणाच्या तथ्यांमध्ये नमूद केले आहे. मी ही बाब माझ्या पातळीवर देखील मांडत आहे कारण मी तुम्हाला आधीच्या पत्रात सांगितले होते. लेखक संपत यांच्या मते, गांधीजींनी 26 मे 1920 रोजी यंग इंडियामध्ये ‘सावरकर बंधू’ नावाचा एक लेख लिहिला होता, ज्यात त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी आवाज उठवला होता.