MNS : हलाल विरुद्ध झटका वाद पुन्हा उफळला, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक 

मुंबई : मुंबई : मशिदींवरील भोंगेहटाव आंदोलनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता ‘हलाल’ या मटण कापण्याच्या पद्धतीविरोधात आंदोलन पुकारले आहे. मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.  बाजारात हलालचे मटण घेण्यावर दबाव वाढत आहे. मात्र झटका मटणाला विरोध होत आहे. हलालमुळे हिंदू खाटीक वाल्मिकी समाजास रोजी रोटी मिळत नाही असं ते म्हणाले. (no to halal )

यावेळी किल्लेदार म्हणाले, हलाल आणि झटका या कत्तलीच्या पद्धती आहेत. हा मुद्दा फक्त धार्मिक (religious) आहे असं नाही. 15 टक्के मुस्लिम धर्मीयांसाठी हलाल पद्धत असली तरी इतर धर्मियांनी हे का मानायचं. अरब देशात हलाल केलेल्या मासाची मागणी आहे. म्हणून हे जास्त केलं जातं. याचे पैसे अतिरेकी केसेस लढण्यासाठी वापरतात. यासाठी जनजागृती म्हणून चळवळ उभी करणार आहोत. या चळवळीचे नाव राहणार आहे, नो टू हलाल मोहीम राबविणार अशी माहिती मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिली.

आमचा विरोध हलालला नाही पण झटका मीटही विकले पाहिजे. पत्र देऊनही ऐकले तर ठीक न ऐकल्यास संबधित कंपनींना मनसे स्टाईलने (MNS style) उत्तर दिले जाईल. येत्या काळात व्यापाऱ्यांच्या असोसिएशनचीही (trade association) बैठक घेऊन त्यांना मुद्दा स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

हलाल ही पद्धत मुस्लिमांना पाहिजे तर त्यांनी ठेवावी पण ती इतरांवर लादू नये. आम्ही येत्या काळात पत्रक काढू, ज्या कंपन्या आहेत त्यांना माहिती देऊ. पत्र देऊनही ऐकले तर ठिक न एकल्यास संबधित कंपनींना मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल. येत्या काळात व्यापार्यांच्या असोसिएशनचीही बैठक घेऊन त्यांना मुद्दा स्पष्ट करणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.