भारतीय स्टेट बँकेने उद्योजकांसाठी प्लॅटिनम करंट अकाऊंट सुरू केले आहे. बँकेने नुकतेच याविषयी त्यांच्या ट्विटर खात्यावरून माहित दिली आहे.व्यवसायिकांसाठी चालू खाते फार महत्त्वाचे असते कारण रोजच्या व्यवहारासाठी चालू खात्याचा उपयोग होतो. म्हणूनच या योजनेअंतर्गत व्यावसायिकांना बऱ्याच सुविधा मोफत मिळणार आहेत.
तुम्ही जर तुमच्या व्यवसायासाठी रोजचे आर्थिक व्यवहार बँकेमार्फत करत असाल तर प्लॅटिनम करंट अकाऊंट तुम्हाला योग्य सेवा देऊ शकते कारण या खात्यात जवळपास २ कोटींपर्यंतचे डीपॉजिट मोफत आहेत . तर RTGS आणि NEFT सुद्धा मोफत देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायातून अधिकचा नफा अपेक्षित असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरेल.
विशेष म्हणजे प्लेटिनम करंट अकाउंटमध्ये महिन्याला १० लाखांचा एवरेज बॅलेंस ठेवू शकता. बँकेत खाते असलेल्या शाखेतून अमर्यादित कॅश विड्रॉवल करू शकता . तसेच अनलिमिटेड मोफत RTGS आणि NEFT , अनलिमिटेड मोफत मल्टीसिटी चेक लीफ ,अनलिमिटेड मोफत डिमांड ड्राफ्ट आणि २ कोटी रुपयांपर्यंत मोफत डीपॉजिट सेवा मिळते . त्याचबरोबर SBI च्या सर्व शाखेतून पैसे जमा किंवा काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे . मोफत प्रीमियम बिझिनेस डेबिट कार्ड आणि त्यावर दररोज 2 लाखांपर्यंतची विड्रॉवल मर्यादा यासह सुरक्षित आणि जलद मोफत इंटरनेट बँकिंग सेवा , नॉमिनेशनची सुविधा देखील मिळते .