भाजपचा विजय लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांना अर्पण करतो – फडणवीस 

मुंबई – राज्यसभेच्या सहा जागांचा निकाल (Maharashtra Rajya Sabha Election 2022result ) जाहीर झाला आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचे तीन तसेच भाजपचेही तीन उमेदवार विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे

कुणाला किती मते मिळाली ?-  प्रफुल्ल पटेल- राष्ट्रवादी काँग्रेस- 43,  इम्रान प्रतापगढी – काँग्रेस – 44, पियुष गोयल – भाजप – 48, अनिल बोंडे- भाजप- 48, संजय राऊत- शिवसेना – 41, धनंजय महाडिक – भाजप. (Praful Patel – Nationalist Congress – 43, Imran Pratapgadhi – Congress – 44, Piyush Goyal – BJP – 48, Anil Bonde – BJP – 48, Sanjay Raut – Shiv Sena – 41 , Dhananjay Mahadik – 41.56BJP.) .

महाविकास आघाडीचं पुरेसं संख्याबळ असताना देखील अनेक मतं फोडून भाजपने धनजंय महाडिक यांना राज्यसभेवर निवडून आणलं. राज्यसभेसाठी पहिल्या पसंतीची मतं घेऊन प्रफुल्ल पटेल, संजय राऊत, पियुष गोयल, अनिल भोंडे, इम्रान प्रतापगडी विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिक यांच्यात लढत झाली. त्यात महाविकास आघाडीची पाच मते फुटल्याचे प्राथमिक दिसून येत आहे.

दरम्यान, या विजयानंतर आता विरोधीपक्षनेते देवेद्न फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘आमच्या सगळ्यांकरिता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की भाजपचे तीनही उमेदवार याठिकाणी निवडून आलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर हा जो विजय आहे हा विजय मी आमचे लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप यांना समर्पित करतो आणि त्याचप्रमाणे आमच्या दुसऱ्या लढवय्या आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित करतो.”लक्ष्मणभाऊ अॅम्ब्युलन्समध्ये बसून एवढ्या लांब प्रवास करुन इकडे आले. मी काल त्यांना फोन करुन त्यांच्या बंधूंना सांगितलं की, आम्हाला लक्ष्मणभाऊ जास्त महत्त्वाचे आहेत सीट आली काय किंवा गेली काय भविष्यात परत जिंकू. पण लक्ष्मण भाऊचा जीव महत्त्वाचा आहे. पण लक्ष्मण भाऊंनी सांगितलं की, काय वाट्टेल ते झालं तरी माझ्या पक्षाकरता मी येणार आहे. त्यामुळे मी त्यांचे खरोखर मनापासून आभार मानतो.’ असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी आपल्या आमदारांचे आभार मानले.

‘आजचा विजय सर्वार्थाने महत्त्वाचा विजय आहे. महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला बहुमत दिलं होतं. पण ते बहुमत आमच्या पाठीत खंजीर खुपसून काढून घेण्यात आलं आणि अशाप्रकारचं सरकार हे किती अंतर्विरोधाने भरलं जातं हे आपल्याला आजच्या विजयानंतर पाहायला मिळालेलं आहे.’ अशी टीकाच देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर केली.

‘सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, आमचे जे तिसरे उमेदवार निवडून आले आहेत त्यांनी शिवसेनेच्या प्रथम उमेदवारापेक्षा म्हणजे संजय राऊतांपेक्षाही जास्त मतं घेतलेली आहेत. आमचे धनंजय महाडिक 41.56 मतं मिळाली जी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त आहे.’ अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीसांनी राऊतांवर केली.

‘सगळ्यात महत्त्वाचं कारण उद्या काय-काय मुजोरी होणार आहे हे माहित असल्याने जे मत बाद झालं शिवसेनेचं ते मत ग्राह्य धरलं असतं तरी आमचा विजय झाला असता. नवाब मलिकांना कोर्टाने परवानगी दिली असती तरीही आमचा विजय झाला असता. त्यामुळे हा आमचा खराखुरा विजय आहे. हा कुठल्याही जोडतोडचा विजय नाही. तर पूर्ण कोटा करुन आम्ही हा विजय मिळवलेला आहे.’ असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

‘त्यामुळे मी भाजपच्या सर्व आमदारांचं आम्हाला साथ देणाऱ्या सर्व आमदारांचं आणि जे आमच्यासोबत नव्हते. तरीही ज्यांनी आम्हाला मतदान केलं असे अपक्ष आणि छोट्या पक्षाचे जे काही आमदार आहेत अशा सगळ्यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि हा जो काही विजय आहे हा विजय महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करतो आणि पुन्हा एकदा जे स्वत:ला महाराष्ट्र समजतात जे स्वत:लाचा मुंबई समजतात, जे स्वत:लाच मराठी समजतात त्यांना हे लक्षात आणून दिलं की, या विजयाने महाराष्ट्र म्हणजे ते नाहीत. तर महाराष्ट्र म्हणजे 12 कोटी जनता.’ अशी टिप्पणी करत देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला.

‘मला विश्वास आहे की, ही जी काही विजयाची मालिका सुरु झाली आहे. मला कोणालाही या विजयाच्या क्षणी कोणाच्याही बद्दल वाईट बोलायचं नाही. कोणालाही खाली दाखवायचं नाहीए. कोणाचाही उपहास करायचा नाहीए. पण मी एवढंच म्हणेन की, विजयाची मालिका सुरु झाली आहे आणि आता ही मालिका पुढे सुरु राहील.’ असा दावा देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला आहे.(see-what-devendra-fadnavis-said-after-victory-of-rajya-sabha-election-).