मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर आज इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. जान्हवीने फार कमी वेळात हिंदी चित्रपटसृष्टीत एक नवी ओळख निर्माण केली आहे. ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जान्हवी कपूरचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे. अभिनयासोबतच जान्हवी सोशल प्लॅटफॉर्मवरही खूप सक्रिय आहे. आजकाल जान्हवी तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित पोस्ट चाहत्यांमध्ये शेअर करत असते. पण याच दरम्यान जान्हवीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
जान्हवी कपूर नेहमीच तिच्या ड्रेसिंग सेन्सने चाहत्यांची मने जिंकते. पण यावेळी तिच्या ड्रेसिंग स्टाइलने चाहते निराश आहे. नुकतीच जान्हवी कपूर मुंबईत स्पॉट झाली आहे. यादरम्यानचा तिचा व्हिडिओ बॉलीवूडचे प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भियानी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जान्हवीला येताना पाहून पापाराझी पुन्हा पुन्हा तिचे नाव घेताना दिसत आहेत. पण जान्हवी खूप घाई करताना दिसत आहे. यावेळी तिने काळ्या रंगाचा अतिशय छोटा ड्रेस परिधान केला आहे. जान्हवी कारमध्ये बसताच तिचा ड्रेस वरती गेला आणि अभिनेत्रीचा तो क्षण कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही चाहते समर्थन करत आहेत. त्याच वेळी, अनेक युजर्स संतप्त व्यक्त करताना दिसत आहेत.
एका युजर्स लिहिले – ‘अभिनेत्री आशा वागतात जसे ते त्यांचे मित्र किंवा जवळच्या नातेवाईकानेमध्ये वावरतात. त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, ‘ती तिची पॅन्ट विसरली आहे.’ तर तिथेच एकाने ‘तिला वॉर्डरोब बदलावा लागेल’ असे सांगितले.
जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने अलीकडेच तिच्या ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव पुन्हा एकदा तिच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट 7 ऑक्टोबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय जान्हवीकडे ‘गुड लक जेरी’, ‘मिली’, ‘बॉम्बे गर्ल’ आणि ‘दोस्ताना 2’ चित्रपट प्रोजेक्ट आहेत.
https://www.youtube.com/watch?v=iLGbybjU9tc