वंचित बहुजन आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी अतुल बहुले यांची निवड

पुणे : वंचित आघाडीचे संस्थापक अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने पुण्याचे भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष, वंचित आघाडीचे राज्य देखरेख समितीचे सदस्य अतुल बहुले यांना अतिशय महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे .त्यांना पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांना निवडीचे पत्र आज प्रदेशाध्यक्षा प्रा.रेखा ठाकूर यांच्या हस्ते देण्यात आले .

या निवडीमुळे पुण्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील जुन्या आणि तरुण कार्यकर्त्यां मध्ये अतिशय उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे . बहुले यांनी वंचित आघाडीच्या सुरुवातीच्या पुण्यातील राज्यस्तरीय सभा तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकित अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडली होती .

अतुल बहूले यांनी उरुळी देवाची गावचे उपसरपंच पद ही भूषवले होते .हडपसर ,फुरसुंगी ,उरुळी देवाची , शेवाळवाडी या परिसरातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी फार मोठा लढा उभारला होता.त्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते .त्यांच्या या निवडीने. पुण्याला पश्चिम महाराष्ट्र कार्यकारणी वर महत्त्वाची भूमिका मिळाल्याचे बोलले जात आहे.