संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेच्या प्रवक्तेपदी धनंजय जाधव, करण गायकर यांची निवड

कोल्हापूर – स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे (Swarajyapramukh Chhatrapati Sambhaji Raje) यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेच्या ( Swarajya Sanghatana) अधिकृत प्रवक्ते पदी डॉ. धनंजय राजाराम जाधव (spokesperson, Dr. Dhananjay Rajaram Jadhav) आणि करण पंढरीनाथ गायकर (Karan Pandharinath Gaikar) यांची निवड करण्यात आली. विस्थापितांना न्याय देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) व राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) यांच्या आदर्शांवर चालत महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला संघटित करण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे.

डॉ. धनंजय जाधव व करण पंढरीनाथ गायकर यांनी मराठा आरक्षण, अनेक सामाजिक आंदोलने व न्यायालयाच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांची सोडवणूक केली आहे. तसेच समाजातील वंचित व सोशिक घटकांसाठी ते गेल्या १४ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीचे समाजाच्या सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.