मुंबईतील फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी डीसीपीआरमध्ये स्वतंत्र तरतूद

मुंबईतील फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी डीसीपीआरमध्ये स्वतंत्र तरतूद

मुंबई | मुंबईतील सांताक्रूझ, पार्ले व कुर्ला या भागात विमानतळाच्या फनेल झोनमधील उंचीच्या निर्बधांमुळे बाधित इमारतींचा ( Mumbai Funnel Zone) पुनर्विकासास चालना मिळावी यासाठी बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-२०३४ मध्ये स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. उंचीच्या निबंर्धामुळे जर जागेवर वापरात येणे शक्य नसल्यास तर तेवढया क्षेत्राचा टिडीआर मालकाला उपलब्ध करुन देण्याचा पुरोगामी निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली. यामुळे निर्बंध असलेल्या बृहन्मुंबई क्षेत्रातील बाधित क्षेत्रातील जुन्या इमारतींचा पुनर्विकास सुसह्य होणार असल्याचे उमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यासंदर्भात निवेदन करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बृहन्मुंबई क्षेत्रातील उंचीचे निर्बंध असलेल्या विमानतळ फनेल झोन मधील जुन्या इमारतींचा पुनर्विकास सुसह्य व्हावा ( Mumbai Funnel Zone) याकरिता नियमावलीमध्ये विशिष्ट तरतूद करण्यासाठी बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-२०३४ मध्ये स्वतंत्र तरतूद करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे.

त्यानुसार बेसिक चटई क्षेत्र / अधिकृत इमारतीने व्याप्त क्षेत्र यापैकी जे जास्त असेल त्या क्षेत्राचा पुनर्विकासात वापर करण्याचा अधिकार समजून असे क्षेत्र उंचीचे निबंर्धामुळे जर जागेवर वापरात येणे शक्य नसल्यास तर तेवढया क्षेत्राचा टिडीआर मालकास उपलब्ध करुन देण्याचा पुरोगामी निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच ओपन स्पेस मधील कमतरता क्षमापीत करण्यासाठी व जीना, लिफ्ट इत्यादीचा चटई क्षेत्र निर्देशांकात समावेश न करण्याकरीता भरावयाचे अधिमूल्य सवलतीच्या दराने आकारण्याबाबत देखील निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१कक) अन्वये फेरबदलाची सूचना जाहिर करण्यात येत आहे. या फेरबदलामुळे फनेल झोनमधील, तसेच अशा प्रकारे निर्बंध असलेल्या बृहन्मुंबई क्षेत्रातील इतर बाधित क्षेत्रातील जुन्या इमारतींचे पुनर्विकास सुसह्य होणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

“OTT प्लॅटफॉर्म, स्टँडअप कॉमेडी शोजमधील आक्षेपार्ह मजकुराबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा”

कुणाल कामरा हा वाह्यात बोलणारा विकृत माणूस – Manisha Kayande

भारतरत्न देताना महात्मा फुले यांचे माहात्म्य कुठेही कमी होता कामा नये – Chhagan Bhujbal

Previous Post
क्रशर व खाणपट्टाधारकांनी परवानगी घेवूनच उत्खनन करावे - District Collector Jitendra Dudi

क्रशर व खाणपट्टाधारकांनी परवानगी घेवूनच उत्खनन करावे – District Collector Jitendra Dudi

Next Post
बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाचे काय झाले? अहवालाची लपवाछपवी का? | Harshvardhan Sapkal

बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाचे काय झाले? अहवालाची लपवाछपवी का? | Harshvardhan Sapkal

Related Posts
परदेश फिरायची आवड आहे, पण खिशात पैसे नाहीत? चिंता नको, 'या' देशात अगदी स्वस्तात करु शकता प्रवास

परदेश फिरायची आवड आहे, पण खिशात पैसे नाहीत? चिंता नको, ‘या’ देशात अगदी स्वस्तात करु शकता प्रवास

Travel Tips: तुम्ही तुमचा परदेश प्रवासाचा (Foreign Trip In Budget) बेत पुढे ढकलत आहात कारण तिथला खर्च तुम्हाला…
Read More
ऍपलला टक्कर देण्यासाठी सॅमसंगचा मिक्स्ड रिअॅलिटी हेडसेट येतोय, जाणून घ्या कधी लॉन्च होणार

ऍपलला टक्कर देण्यासाठी सॅमसंगचा मिक्स्ड रिअॅलिटी हेडसेट येतोय, जाणून घ्या कधी लॉन्च होणार

Apple Vision Pro शी स्पर्धा करण्यासाठी Samsung, Google आणि Qualcomm 2024 च्या अखेरीस त्यांच्या मिक्स्ड रियलिटी (MR) हेडसेटचे…
Read More
शरद पवार गट भाजपसोबत जाण्याच्या हालचाली, राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता म्हणाला...

शरद पवार गट भाजपसोबत जाण्याच्या हालचाली, राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता म्हणाला…

काल दुपारी उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील ( Sharad Pawar group) एक बडा नेता…
Read More