बहुजन वंचितच्या नेत्याविरोधात गंभीर गुन्हा दाखल; रामभक्त हनुमानावर केली अश्लाघ्य टीका

अमरावती – बहुजन वंचित आघाडीचे पदाधिकारी ऍड. सिद्धार्थ गायकवाड यांनी फेसबुक वर रामभक्त हनुमानावर अतिशय अश्लाघ्य व हिंदूंच्या भावना दुखावणारी पोस्ट केली म्हणून त्यांच्या विरोधात बडनेरा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सिद्धार्थ गायकवाड यांनी फेसबुक वर हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या श्रीरामभक्त भगवान हनुमानावर हिंदूंच्या भावना दुखावतील अशी पोस्ट केली होती. सिद्धार्थ गायकवाड हा इसम सातत्याने समाज माध्यमांवर हिंदू देवी देवतांवर घाणेरड्या शब्दात टीका करतो. या इसमाच्या डोक्यात जातीय द्वेष पेरला असून तो यासाठी सातत्याने समाजमाध्यमांचा वापर करतो.असा आरोप करण्यात येत आहे.

काल सिद्धार्थ गायकवाडच्या पोस्ट मुळे हिंदू समाजात रोष निर्माण झाला होता. बडनेरा येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ते राजेश मन्नालाल शर्मा, तुषार रमेश अंभोरे, किरण मधुकरराव अंबाडकर, योगेश निमकर, विश्वजित डुमरे, उमेश निलगिरे यांच्यासह अनेक तरुणांनी बडनेरा पोलीस ठाण्यात सिद्धार्थ गायकवाडच्या विरोधात तक्रार नोंदवली. बडनेरा पोलिसांनी सिद्धार्थ गायकवाडच्या विरोधात 153 अ, 295 अ आणि 505 (2) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सिद्धार्थ गायकवाड यास तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.