शाहरुख खानच्या पोराने कहर केला; ‘या’ सुपरहॉट अभिनेत्रीला करतोय डेट?

Mumbai: बॉलिवूडमध्ये (Bollywood) नवनवीन कपल्स तयार होताना दिसत आहेत. स्टार्समधील अफेअर आणि ब्रेकअपच्या बातम्या काही नव्या नाहीत. अलीकडेच तारा सुतारिया आणि आधार जैन यांच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. आता प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा (Shahrukh Khan Son) आर्यन खान (Aryan Khan) आणि नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज सोशल मीडिया यूजर्स लावत आहेत. मात्र, या बातमीमध्ये किती तथ्य आहे? जाणून घेऊया…

सोशल मीडियावर आर्यन खान आणि नोरा फतेहीचे काही फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या अफेअरबाबत (Aryan Khan Nora Fatehi Affair) चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक, आर्यन खान आणि नोरा फतेहीचे काही सामान्य लोकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंनी सोशल मीडिया युझर्सला त्यांच्या रिलेशनशीपचा अंदाज लावण्याची पुरेशी संधी दिली आहे. त्यांचे दोन फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

एका फोटोत आर्यन दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत नोरा फतेही आहे. पण, दोन्ही फोटोंमध्ये एक गोष्ट समान आहे. एकाच चाहत्याने दोन्ही स्टार्ससोबत फोटो क्लिक केल्याचे फोटोंमध्ये दिसून येते. यानंतर यूजर्स बोलू लागले आहेत की, आजकाल आर्यन आणि नोरा एकमेकांना डेट करत आहेत आणि एकत्र वेळ घालवत आहेत.

https://www.instagram.com/p/Cm6-jZ3hIQF/?utm_source=ig_web_copy_link

एका यूजरने या फोटोंखाली कमेंट करताना लिहिले की, ‘दोघांचा एकाच फॅनसोबतचा फोटो असण्याचा अर्थ असा तर नाही की, हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत?’ मात्र, सध्या या दोन्ही स्टार्सनी डेटिंगबद्दल कोणतेही भाष्य केलेले नाही.