शाहिद आणि मृणालचा जर्सी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

मुंबई : दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये शाहिद कपूरचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. जेव्हा त्याचा कबीर सिंग हा चित्रपट आला होता. शाहिदचा ‘कबीर सिंह’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहीद रुपेरी पडद्यावर पुन्हा पदार्पण करतोय आणि त्याच्या परतीची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. प्रेक्षकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे कारण शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांचा चित्रपट ‘जर्सी’ लवकरच प्रदर्शित होणार आहे.

क्रिकेटवर आधारित असलेला हा चित्रपट ‘भारतीय क्रिडा दिवसा’च्या एक दिवसअगोदर प्रदर्शित होणार आहे. शाहिदचा ‘कबीर सिंह’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. आता ‘जर्सी’ चित्रपटात शाहिदची भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम तिन्नानौरी हे करत आहेत. तिन्नानौरी यांनीच ‘जर्सी’ या तेलगु चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दरम्यान, पंकज कपूर 2015 नंतर वेब प्लॅटफॉर्मवर ‘टोबा टेक सिंह’ मध्ये झळकले होते. आता 5 वर्षांच्या ब्रेकनंतर त्यांचा ‘जर्सी’ हा चित्रपट येत आहे. ‘जर्सी’ या चित्रपटात पंकज आणि शाहिद कपूर या पिता-पुत्रांना एकत्र पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

जर्सी’ हा चित्रपट तेलगु चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये शाहिद कपूर, पंकज कपूर, मृणाल ठाकूर यांच्याही भूमिका असणार आहे.  विशेष म्हणजे या चित्रपटात पंकज कपूर शाहिद कपूरच्या कोचच्या भूमिकेत दिसणार आहे. याअगोदर 2015 मध्ये ‘शानदार’ चित्रपटात शाहिद आणि पंकज कपूर एकत्र दिसले होते. तसेच 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मौसम’ चित्रपटाचे दिग्दर्शन पंकज कपूर यांनी केले होते. आज शाहिदने जर्सीचे पहिले पोस्टर शेअर केले आणि सांगितले की, हा चित्रपट 31 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यासोबतच त्यांनी हेही सांगितले की, चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबरला येतोय.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

You May Also Like