कियारा अडवाणीपुढेच प्रायव्हेट पार्टबद्दल असे काही बोलला शाहीद कपूर, अभिनेत्री लाजून लालेलाल

मुंबई- बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ या शोचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याच्या या शोमधील सेलिब्रिटींचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. याच शोमधील आणखी एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओत ‘कबीर सिंग’ या सुपरहिट हिंदी सिनेमातील अभिनेता शाहीद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) दिसत आहेत.

कॉफी विथ करणच्या (Koffee With Karan) या एपिसोडमध्ये शाहीदने त्याच्या शरीराच्या सर्वात सेक्सी पार्टबद्दल खुलासा केला. यावेळी त्याची जीभ घसरली, जे पाहून होस्ट करण आणि अभिनेत्री कियाराही चकित झाले.

करण जोहरने स्वत: त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कॉफी विथ करणमधील शाहीद आणि कियारासोबतच्या एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत दिसते की, होस्ट करण अभिनेता शाहीदला प्रश्न विचारतो की, त्याच्या शरीराचा सर्वात सेक्सी पार्ट कोणता आहे? यावर काहीही विचार न करता शाहीद म्हणतो की, तो पार्ट सध्या कॅमेरावर दिसत नाहीये. त्याच्या या उत्तरावरून सहज लक्षात येते की, शाहीद त्याच्या प्रायव्हेट पार्टबद्दल बोलत आहे. त्याचे हे उत्तर ऐकून बाजूला बसलेली कियारा चकित होते. तर करणलाही त्याचे उत्तर हसू फुटते.

दरम्यान कियारा आणि शाहीद त्यांच्या आगामी सिनेमा ‘गोविंदा मेरा नाम’च्या प्रोमोशनसाठी कॉफी विथ करण शोमध्ये सहभागी झाले होते. या सिनेमात विक्की कौशल आणि भूमि पेडणेकर हेदेखील मुख्य भूमिकेत आहेत.