महाराष्ट्र सरकार अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) सुमारे ९ कोटी रुपये परत करण्याची याचिका मंजूर करू शकते. ज्यामध्ये असा दावा केला आहे की मुंबई उपनगरीय जिल्ह्याच्या (MSD) जिल्हाधिकाऱ्यांना त्या जमिनीसाठी अतिरिक्त पैसे देण्यात आले होते. ज्यावर शाहरुखचे घर ‘मन्नत’ बांधले आहे. वांद्रे पश्चिमेकडील बँडस्टँड येथे शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या नावावर नोंदणीकृत असलेला हा बंगला राज्य सरकारने मूळ मालकाला भाड्याने दिलेल्या जमिनीवर बांधला आहे. नंतर, सरकारने कराराला मान्यता दिली, त्यानंतर मालकाने ती मालमत्ता शाहरुख खानला विकली.
यानंतर, या जोडप्याने ‘मन्नत’ आता जिथे आहे त्या जमिनीसाठी केलेल्या अतिरिक्त देयकाची परतफेड करण्याची मागणी केली. शाहरुख खान आणि गौरी खान यांचे हे घर २,४४६ चौरस मीटरमध्ये पसरलेले आहे. तसेच ते शाहरुख आणि गौरीच्या नावावर नोंदणीकृत आहे. असे सांगितले जात आहे की अभिनेता आणि त्याच्या पत्नीने राज्य सरकारच्या धोरणाचा फायदा घेण्याचा निर्णय घेतला. ज्या अंतर्गत तो मागील मालकाकडून त्या भाडेपट्ट्याने घेतलेल्या जमिनीवर मालकी हक्क मिळवू शकतो.
शाहरुख खानच्या ‘मन्नत’ प्रकरणात चूक
गौरी आणि शाहरुखने (Shah Rukh Khan) मार्च २०१९ मध्ये रेडी रेकनर किमतीच्या २५ टक्के रक्कम भरली, जी २७.५० कोटी रुपये होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख आणि गौरी यांना नंतर कळले की राज्य सरकारने रूपांतरण शुल्क मोजताना ‘अनावधानाने चूक’ केली होती. असे म्हटले जाते की रूपांतरण शुल्क मोजताना, जमिनीच्या तुकड्याऐवजी बंगल्याची किंमत विचारात घेण्यात आली.
शाहरुख खानला मिळणार अतिरिक्त पैसे
आता सप्टेंबर २०२२ मध्ये खान कुटुंबाला ही ‘अनावधानाने झालेली चूक’ लक्षात आली आणि गौरी खानने जिल्हाधिकारी एमएसडी यांना पत्र देऊन अतिरिक्त देयक, जे ९ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते, परत करण्याची मागणी केली. सूत्रांनी फ्री प्रेस जर्नलला सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी ते अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवले आहे. राज्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंजूर झाल्यानंतर जास्तीचे पैसे परत केले जातील.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
महाराष्ट्रात सातत्याने भ्रष्टाचार होतोय मग त्याची चौकशी का होत नाही? – Supriya Sule