शाकिब अल हसनचे संतापजनक कृत्य! सार्वजनिकरित्या चाहत्याला केली मारहाण

बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार शकिब अल हसनचा (Shakib Al Hasan) आणि वाद यांचे जुने नाते आहे. पुन्हा एकदा शाकिबने असे कृत्य केले आहे, ज्यानंतर तो लोकांच्या निशाण्यावर आला आहे. शाकिब अल हसनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हा अष्टपैलू खेळाडू मोठ्या गर्दीत आपला संयम गमावतो आणि एका चाहत्याला सार्वजनिकरित्या मारहाण करताना दिसत आहे.

शाकिब अल हसनने एका चाहत्याला मारहाण केल्याचा हा व्हिडिओ फेसबुकवर एका यूजरने शेअर केला आहे. शाकिब एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये गेला होता, जिथे त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, एका व्यक्तीने शाकिबची टोपी काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे बांगलादेशी अष्टपैलू खेळाडू इतका संतापला की त्याने आधी त्याची टोपी हिसकावून घेतली आणि नंतर चाहत्याला मारले. शाकिबच्या रागाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर क्रिकेट चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.