शक्ती कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात संमत होईल – दिलीप वळसे-पाटील

शक्ती कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात संमत होईल – दिलीप वळसे-पाटील

नागपूर : महाराष्ट्र पोलीस दलाची जागतिक पोलीस दल म्हणून ख्याती आहे. नागपुरात आज उद्घाटन झालेल्या फास्टट्रॅक डीएनए युनिट व वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागामुळे कायद्याला बळकटी आणण्यासाठी आवश्यक पुरावे उपलब्ध करणे, गुन्ह्याला वाचा फोडणे व गुन्हेगाराला कडक शासन करणे या प्रक्रियेला गती मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

नागपूर येथे राज्याच्या गृह विभागामार्फत रहाटे कॉलनीस्थित प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये देशातील वन्यजीवांच्या पहिल्या तर मानवी डीएनएच्या राज्यातील नव्या प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज या वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने केले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये भारतातील वन्यजीवांच्या पहिल्या तर निर्भया योजनेतंर्गत मानवी डीएनएच्या एकत्रित तीन प्रयोगशाळेचे उद्घाटन करताना गृह खात्याच्या कामकाजाला बळकटी देत असल्याचा आनंद आहे, असे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, महिला व बालक यांच्या संदर्भातील गुन्ह्यांचा तपास जलदगतीने करताना अडचण येते. या प्रयोगशाळेमुळे तपासाला गती येणार आहे. वन्यजीवांच्या हत्येप्रकरणी तस्करी रोखताना, अशा तस्करांवर कारवाई करताना आता ही प्रयोगशाळा कामी येणार आहे.

आपले तंत्रज्ञान हे गुन्हेगारांच्या पुढे असले पाहिजे. त्यामुळे जगातील बदल लक्षात घेऊन आज फास्टस्ट्रॅक मुंबई, नागपूर, पुणे येथील प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उद्घाटन केले जात आहे. महाराष्ट्राचे पोलीस, मुंबई पोलीस यांचा संपूर्ण देशात दरारा आहे. तपासामध्ये या नव्या प्रयोगशाळेचा निश्चितच लाभ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही संबोधित केले. राज्यात लवकरच महिलांच्या संरक्षणासाठी शक्ती कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात संमत होईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, महिला व मुलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली आहे. यावर आळा घालण्यासाठी महाविकास आघाडीने शक्ती कायदा तयार केला आहे. हा कायदा लवकरच संमत केला जाणार आहे. या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ शिक्षा देण्यासाठी फास्टट्रॅक डीएनए युनिटची मोठी भूमिका राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

निसर्गातील समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे रक्षण करणे आवश्यक आहे. वाघासह इतर लहान-मोठ्या प्राण्यांची शिकार केली जाते. यामुळे निसर्गातील समतोलावर विपरित परिणाम होत आहे. हे टाळण्यासाठी व या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी वन्यजीव डीएनए विश्लेषण विभाग मोलाची भूमिका बजावणार असल्याचे श्री. वळसे पाटील यांनी सांगितले.

ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या प्रयोगशाळेमुळे तपास यंत्रणेच्या नव्या पर्वाला सुरूवात होत असल्याचा आनंद व्यक्त केला. यावेळी बोलताना डॉ. राऊत म्हणाले, या युनिटमुळे पोलिसांना गुन्ह्यांचा तपास करण्यास लागणारा कालावधी कमी होणार आहे. एवढेच नव्हे तर तपासामध्ये अधिक अचूकता येणार आहे. महिलांची सुरक्षितता ही महाविकास आघाडीची प्राथमिकता आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यावर त्वरित कारवाई करून कायद्याचा एका वचक निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे.

हे ही पहा:

https://www.youtube.com/watch?v=Egi–9bLtao

Previous Post
MSEB

महावितरणच्या कारभारावर नाराजी दर्शवत शिवसेनेच्या माजी आमदाराने दिला ‘हा’ इशारा

Next Post
भाजपच्या उमेदवारचे डिपॉझिट कोणत्याही परिस्थितीत जप्त झाले पाहिजे - छगन भुजबळ

भाजपच्या उमेदवारचे डिपॉझिट कोणत्याही परिस्थितीत जप्त झाले पाहिजे – छगन भुजबळ

Related Posts
Anand_Dighe-CM_Eknath_Shinde.

Anand Dighe : आनंद दिघेंच्या स्मृतिदिनानिमित्त एकनाथ शिंदेंनी पोस्ट केलेली चारोळी चर्चेत

ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे राजकीय गुरु आनंद दिघे यांचा आज स्मृतीदिन आहे. याचनिमित्त…
Read More
navin shekharappa - modi

‘प्रजा मरते रहे प्रचार चलते रहे… वाह विश्वनेता वाह !’

मुंबई : युक्रेन-रशियाच्या युद्धात युक्रेनमध्ये गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. नवीन शेखरप्पा असे या विद्यार्थ्यांचं नाव…
Read More
प्रतिकूल परिस्थितीत बंजारा समाजाचा देश आणि धर्मासाठी संघर्ष - योगी आदित्यनाथ 

प्रतिकूल परिस्थितीत बंजारा समाजाचा देश आणि धर्मासाठी संघर्ष – योगी आदित्यनाथ 

जामनेर – प्रतिकूल परिस्थिती बंजारा समाजाने देश आणि धर्मासाठी संघर्ष  केला असून हा समाज वीरांचा समाज असल्याचे प्रतिपादन…
Read More