शक्तीपीठ महामार्ग विरोधात 12 मार्चला विधानसभेवर भव्य मोर्चा काढणार | Satej Patil

शक्तीपीठ महामार्ग विरोधात 12 मार्चला विधानसभेवर भव्य मोर्चा काढणार | Satej Patil

Satej Patil | शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा असून, हा महामार्ग रद्द व्हावा या मागणी करिता 12 मार्चला विधानसभेवर भव्य मोर्चा काढणार असल्याचं विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जाहीर केलं. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकित ते बोलत होते..

शक्तीपीठ महामार्ग बाधित 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शाहू स्मारक भवन येथे संपन्न झाली. यावेळी बोलताना त्यांनी, शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

राज्यात सत्तेत असणाऱ्या लोकांना कोल्हापूरची मोठी धास्ती होती, म्हणून कोल्हापुर पूर्ता महामार्ग रद्दचा निर्णय सत्तेतील काही मंत्र्यांनी जाहीर केला. मात्र याला कायदेशीर आधार नाही. सरकार मध्ये राहायचं, आणि त्यांच्याच मंत्र्यांनी आणि आमदारानी वेगवेगळी स्टेटमेंट करायचं हे सरकारच षडयंत्र असल्याची टिकाही आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली.

गोव्याकडे जाण्यासाठी पर्यायी रस्त्या असताना सुद्धा शक्तीपिठ का लादला जातं आहे.. 86 हजार कोटीचा हा प्रकल्प असल्याचं सांगण्यात येत आहे. एवढी मोठी रक्कम पाहता एका किलो मीटरला, 110 कोटींचा खर्च येणार आहे…शक्तिपीठ मध्ये कोण फित्तुर होऊ नये यासाठी काळजी घेऊया..न्यायालयात जाण्याऐवजी ही लढाई रस्त्यावर करुया.. असंही त्यांनी सांगितलं. येणाऱ्या अधिवेशनात महाविकास आघाडी म्हणुन आम्ही सर्व जण ताकतीने प्रश्न मांडू.. आपापल्या जिल्हयातील आमदारांचे शक्तीविरोधाबाबत पत्र घ्या. शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा हा प्रकल्प असुन अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात 12 मार्चला भव्य मोर्चा काढण्याचही आम. सतेज पाटील यांनी जाहिर केल. शेतकऱ्यांची ताकत सरकारला दाखऊन देऊ.. मोठया संख्येने या मोर्चात सहभागी व्हा. असं आवाहनही त्यांनी केलं.

ठाकरे गटाचे कोल्हापूर सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी, शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्याच्या भावना तीव्र आहेत. आता या लढ्याला कोल्हापुरातून सुरुवात झाली आहे. कोणत्याही अधिकाऱ्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत राज्य, महायुती सरकारला चालवायचं होतं. मात्र शेतकऱ्यावर अन्याय सुरू आहे. हे सरकार गोरगरीब लोकांना मदत करणारे नाही. कधीही पोट न भरलेली, माणस मंत्री मंडळात आहेत. त्यांना सर्व सामान्यांशी देणंघेणं नाही. अशी टिकाही त्यांनी केली.शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी, सामाजिक न्यायासाठी कोल्हापूर भूमी ओळखले जाते..शक्तीपीठालां होणारा विरोध पाहून सत्ताधिस हादरले आहेत.

राज्यातील दहा जिल्हातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे.एकाही आमदार बरोबर बैठक झाले नसताना बैठक झाल्याचे मुख्यमंत्री खोटे सांगत असून शेतकर्यांचे शेतजमिनी काढून घेण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप केला. भाजपचे कोण कंत्राटदार आहेत त्यांच्या नावा निशी त्यांचा भांडा फोड करण्याचा इशाराही गिरीश फोंडे यांनी दिला. लातूर जिल्हयातील गजेंद्र यळकर यांनी, शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्या जात आहेत. नदीजोड सारखे प्रकल्प द्या बागायती जमिनीवर आरक्षण टाकणारे प्रकल्प नको. अशी मागणी केली.

सोलापूर येथील शेतकरी विजयकुमार पाटील यांनी, कोल्हापूर जिल्हा सोडुन इतर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध नसल्याच भासवण्यात येत आहे. मात्र सोलापूर जिल्हातूनही आमचा शक्ती पिठाला विरोध आहे. त्यामुळं सरकारनं दिशाभूल करू नये. असं सांगीतल.
आमच्या जमिनी आमदारांच्या बापाच्या आहेत काय. असा परखड सवालही त्यांनी केला..परभणी येथिल शेतकरी शांतिभूषण कचवे यांनी, शक्तिपीठ लादू नका अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होईल. असा इशारा दिला. सांगली येथिल घनशाम नलवडे यांनी, शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा हा महामार्ग असल्याचं सांगितलं.हिंगोली येथिल सूरज माळवाड यांनी, देखिल हिंगोली जिल्ह्यातून आमचा विरोध असल्याच सांगीतल. नांदेड येथील कचरू मुढळ यांनी, शक्तिपीठ महामार्ग लादल्यास आम्हीं प्राणाचं बलिदान देऊ. असा इशारा दिला. धाराशिवनगर येथिल संभाजी फडतारे यांनी, आम्ही आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू पाहू शकत नाही. शक्तिपीठ रद्द करा. अशी मागणी केली. यावेळी धाराशिवनगर येथिल सुदर्शन पडवळ, कणेरीवाडी येथील आनंदराव भोसले या शेतकऱ्यांनीही मनोगत व्यक्त केल. या बैठकीला, आमदार जयंत आसगावकर, कॉम्रेड शिवाजी मगदूम,शेतकरी संघाचे संचालक सर्जेराव देसाई, बीडचे शेतकरी लालासाहेब शिंदे, हिंगोलीचे बापूराव ढेरे , नांदेडचे सुभाष मारेलवर, विक्रांत पाटील किणीकर, गोकुळ संचालक प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, बिद्री कारखान्याचे संचालक आर एस कांबळे, उत्तम सावंत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार जीवनामध्ये स्वीकारण्याचा संकल्प युवकांनी करावा – Devendra Fadnavis

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल माफी तर भाजपानेच मागावी | Atul Londhe

“बालकांचे संरक्षण आणि शिक्षणाची गुणवत्ता हा आमचा प्राधान्यक्रम” – Dada Bhuse

Previous Post
धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!

धनंजय मुंडे Bell’s Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!

Next Post
युक्रेन-रशिया युद्धाला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की हेच जबाबदार - Donald Trump

युक्रेन-रशिया युद्धाला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की हेच जबाबदार – Donald Trump

Related Posts

ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्याचा मविआचा हेतू ! प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप

Prakash Ambedkar | महाविकास आघाडीने ओबीसींना उमेदवारीच दिली नाही. उद्या नवीन विधानसभा गठीत झाली की, त्यामध्ये ठराव मंजूर…
Read More
Devendra Fadnavis | अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर चर्चा!

Devendra Fadnavis | अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर चर्चा!

Devendra Fadnavis | लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित यश मिळवला आले नाही. ४८ पैकी केवळ ७ जागा जिंकल्याने…
Read More

जुन्या निवृत्तीवेतन योजनेबाबत मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक – देवेंद्र फडणवीस

मुंबई: जुनी निवृत्तीवेतन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याबाबत मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक असून संबंधित सर्व संघटनांसोबत चर्चा…
Read More