आता धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ..; शालिनी ठाकरेंची खोचक टीका

मुंबई – शिवसेनेवरील वर्चस्वाचा मुद्दा आता आयोगाच्या दारात पोहोचल्याने शिवसेना या पक्षाची अविभाज्य ओळख बनलेले धनुष्यबाण हे चिन्ह पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे रहाणार का, याकडे लक्ष लागले आहे. पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह आपल्याकडेच रहावे यासाठी ठाकरे गटाने यापूर्वीच आयोगाककडे धाव घेतली आहे.

यातच आता  ‘रेल्वे इंजिन भाड्याने द्या’ म्हणून उपदेश देणाऱ्यांवर धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शालिनी ठाकरे यांनी काल (21 जुलै) ट्विट करून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला.

शालिनी यांना यापूर्वीही अनेकवेळा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर कठोर शब्दांत टीका करताना पाहण्यात आलं आहे.एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत दुफळी माजल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेत दोन गट पडल्याने धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कुणाचं या मुद्द्यावर निवडणूक आयोगाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.