सनरायझर्स हैदराबादच्या कॅम्पमधील गोंधळावर शेन वॉटसनने केले ‘हे’  मोठे वक्तव्य  

नवी दिल्ली-  सध्याच्या इंडियन प्रीमियर लीग ( IPL ) मधील सनरायझर्स हैदराबाद (SRH) कॅम्पमध्ये सर्व काही ठीक नाही, असे दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन (Shane Watson) यांचे मत आहे. लिलावानंतर जेव्हा सायमन कॅटिचने फ्रँचायझी सोडली तेव्हा धोक्याची घंटा वाजली असं तो म्हणाला.

केन विल्यमसनच्या (Ken Williamson) नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादला त्यांच्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागला आणि संघाने स्पर्धात्मक उत्साह दाखवला नाही.IPL 2022 च्या मेगा लिलावानंतर काही दिवसांनी सायमन कॅटिचने आपल्या पदाचा राजीनामा दिला तेव्हा धोक्याची चिन्हे सुरू झाली होती असे वॉटसनचे मत आहे.

टॉम मूडी यांना उपनियुक्ती दिल्यानंतर कॅटिचने दोन महिन्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कॅटिचने फ्रँचायझीला सांगितले की तो आयपीएल बबलमध्ये अस्वस्थ आहे आणि बऱ्याच  काळापासून कुटुंबापासून दूर आहे. तथापि, द ऑस्ट्रेलियन मधील अहवालात सूत्रांचा हवाला देऊन त्याने  म्हटले आहे की, कॅटिच संघाचे व्यवस्थापन करण्याच्या पद्धतीशी असहमत होता. दरम्यान, हैदराबाद हा स्पर्धेतील सर्वात कमकुवत संघ असल्याचे दिसत आहे. संघ मजबूत दिसत नाही, असेही शेन वॉटसन म्हणाला.