पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ सहा महिन्यांसाठी तडीपार, पोलीस उपायुक्तांचा आदेश

पुणे : पुण्यातील गँगस्टर आणि कोथरूड भागात दहशत असलेला गुंड शरद मोहोळला (Sharad Mohol) शहरातून तडीपार (Tadipar) करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड (Deputy Commissioner of Police Pournima Gaikwad) यांनी दिले आहे. शहरातील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण करण्याची शक्यता आहे त्यामुळे हे आदेश देण्यात आले आहेत.

शरद हिरामण मोहोळ (वय ३८, रा. माऊलीनगर, सुतारदरा, कोथरुड) याच्या विरोधात पुणे शहर, पिंपरी तसेच ग्रामीण भागात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. टोळीयुद्धातून गणेश मारणे (Ganesh Marne) टोळीतील पिंटू मारणे (Pintu Marne) याचा खून नीलायम चित्रपटागृहाजवळ एका हॉटेलमध्ये शरद मोहोळ आणि साथीदारांनी केला होता. या गुन्ह्यात न्यायालयाने मोहोळला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मोहोळला गेल्या वर्षी जामीन मंजूर केला होता. कारागृहाबाहेर आल्यानंतर मोहोळ आणि साथीदारांनी दहशत माजविण्याचे गुन्हे केले होते.

तडीपार कधी केले जाते?

एखादा गुन्हेगार शहरात गुन्हे करण्याचे थांबवत नसेल तर त्याला तडीपार केले दाते. शरद मोहोळला पुढील सहा महिने पुणे आयुक्तालयाच्या हद्दीत सहा महिने प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे.