शरद पवारांनाही झाली कोरोनाची लागण, ट्वीट करत स्वतः दिली माहिती

मुंबई – राज्यासह देशभरात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेपासून अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रेटी हे देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले असल्याचे दिसून येत आहे. यातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील आता कोरोनाच्या विळख्यात अडकले असल्याचे समोर आले आहे.

पवार यांनी याबाबत स्वतः ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. माझा कोरोना टेस्ट रिपोर्ट सकारात्मक आला असून काळजी करण्याचे काहीही कारण नसल्याचे पवार यांनी सांगितले आहे शरद पवार यांनी ट्विट करून लिहिले की, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण चिंतेचे कारण नाही. मी माझ्या डॉक्टरांनी सुचवलेल्या उपचारांचे पालन करत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतो. स्वतःची चाचणी घ्या आणि आवश्यक ती सर्व खबरदारी घ्या.

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील याबाबत ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आदरणीय पवार साहेबांची Covid टेस्ट positive आली आहे. त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडो,या सदिच्छा..! आदरणीय शरद पवार साहेब,आराम करा आणि काळजी घ्या, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.