Prakash Ambedkar | शरद पवार आणि उद्धव ठाकरे आपला सँडविच केल्याशिवाय राहणार नाहीत, प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन

Prakash Ambedkar | मी गरीब काँग्रेसवाल्यांना म्हणतो की, वाटाघाटीच्या वेळेस तुम्हाला सांगत होतो की, आपला सँडविच झाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. एका बाजूला राष्ट्रवादी ( Sharad Pawar) आणि दुसऱ्या बाजूला उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना हे आपले सँडविच केल्याशिवाय राहणार नाहीत, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार दौलतखान यांच्या प्रचार सभेत व्यक्त केले.

मी काँग्रेसवाल्यांना आवाहन करतो की, आपण वंचितचे उमेदवार दौलत खान यांना मदत करा, विधानसभेत आपण एकत्र लढू शकतो. ॲड. आंबेडकर म्हणाले की, मुंबई उत्तर पूर्व या लोकसभा मतदार संघात फुले – शाहू – आंबेडकरांना आणि त्याच्याच सोबत मानवतेला मानणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी शंभर टक्के मतदान करावे असे त्यांना आवाहन आहे आणि त्यांनी ए.सी. या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करावे.

काँग्रेसवाले म्हणतात की, शिवसेना (ठाकरे) चा प्रचार करून काय उपयोग? ते काय आपल्यासोबत राहणार नाहीत ते उद्या भाजप सोबत जातील. नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे की, उध्दव ठाकरे यांना ज्यावेळी मदत लागेल त्यावेळी मी त्यांना मदत द्यायला तयार आहे. त्यामुळं त्यांचं बोलणं झालं आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप