लोकसभेच्या निकालानंतर आता शरद पवार ( Sharad Pawar) यांनी विधानसभेची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. त्यामुळेच त्यांनी आता महाराष्ट्रातून पहिला उमेदवार जाहीर केला आहे. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील यांना पाठिंबा देण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार सांगली दौऱ्यावर असताना त्यांनी तासगाव येथील आर.आर.पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
आमदार सुमनताईंनंतर आता रोहित पाटील यांच्या पाठीशी उभे राहा, रोहितला बळ द्या, सर्व प्रश्न सोडवू, असे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.
वास्तविक, रोहित पाटील यांचा वाढदिवस असल्याने ते आता तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. आता शरद पवार यांनी उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. सुमनताई पाटील या सध्या तासगावच्या आमदार असून त्यांच्या आधी स्व. आर आर पाटील हे या मतदारसंघाचं नेतृत्व करायचे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप