शरद पवार यांनी ब्राह्मण संघटनांना भेटायता बोलावलं; परशुराम सेवा संघाने घातला बहिष्कार

पुणे –  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार (NCP President Sharad Pawar)  यांनी ब्राह्मण संघटनांना (Brahmin Association)  भेटायता बोलावले आहे. मात्र या बैठकीवर परशुराम सेवा संघ (Parashuram Seva Sangh) बहिष्कार घातला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गले २० वर्षे सतत ची ब्राह्मण विरोधी भूमिका या बहिष्काराचे कारण आहे. याबाबतचे तसे पत्रक प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांच्याकडून काढण्यात आले असून परशुराम सेवा संघाने याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

या पत्रकात नेमकं काय म्हटलं आहे ?

आज महाराष्ट्रात जातीय द्वेषाचे प्रमाण खूप वाढताना दिसत आहे समाज माध्यमे तसेच विविध प्रकारच्या लिखाणामुळे ब्राह्मण समाज विरोधी द्वेष पसरवण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत. काही राजकीय नेते आपल्या लिखाण तसेच वक्तव्यातून हे द्वेषमूलक वातावरण तयार करीत आहेत या सर्व बाबीसंदर्भात आपणास अवगत करणे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून ब्राह्मण समाज विरोधी येत असलेल्या भूमिकामुळे आम्ही हा बहिष्कार घालत आहोत.

2004 साली भांडारकर संस्थेवर हल्ला झाला होता या घटनेनंतर महाराष्ट्रातील जातीय वीण विस्कटली असे अनेक जानकार बोलतात हा हल्ला करणारे सगळे कार्यकर्ते निर्दोष सुटले ज्या कारणामुळे हल्ला केला गेला त्यातले प्रमुख कारण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Shivshahir Babasaheb Purandare)  यांनी जेम्स लेन (James Lane) या लेखकाला माहिती पुरवली असा केलेला आरोप देखील खोटा निघाला हे व्हायता तब्बल अठरा वर्षे जावे लागले परंतु या अठरा वर्षात महाराष्ट्रात जातीयवादाचे विष मुळापर्यंत भिनले ज्याने सर्वाधिक शोषण ब्राह्मण समाजाचे झाले. खालील काही उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की किती दुष्परिणाम यामुळे आम्हाला भोगावे लागते.

महाराष्ट्राच्या 44000 खेड्यांपैकी जवळपास सर्वच खेड्यांमधून ब्राह्मण समाज बाहेर पडला आहे त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी कुळ कायद्याचा गैरवापर करून हडपण्यात आल्या आहेत अशी किमान 20000 एकर जमिनीला मागच्या 20 वर्षात ब्राह्मण समाज मुकला आहे. पौरोहित्य करणाऱ्या ब्राह्मणास सततच्या हेटाळणीमुळे आज ग्रामीण भागात काम करता येत नाही त्यामुळे कोणतीही जमीन, शासकीय फायदे, आरक्षण नसलेला पुरोहित देखील गावाबाहेर काढला गेला.

कोणीतरी एक मूर्ख लेखक येतो काहीतरी लिहितो ज्यावर बंदी असताना काही संघटना ते लिखाण राज्यभर प्रती काढून पोचवतात व आपले प्रशासन स्वराज्यात ज्यांचे मोलाचे योगदान राहिले अशा दादोजी कोडदेवांचा (Dadoji Koddev) पुतळा पाय कापून अर्ध्या रात्री तोडत कारण फक्त दादोजीनी ब्राह्मण कुळात जन्म घेतला? कुणी तिसरा येऊन काहीही लिहिले तरी आम्हाला आमच्या देशी साधनांवर अभ्यासकांवर विश्वास ठेवता येत नव्हता का ?

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) जाहीर केला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन आमदार व आता मंत्री असलेले  जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) राज्यभरात संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) च्या व्यासपीठावरून पुरस्काराता विरोध करणाऱ्या परिषदा घेत होते लोकशाहीत विरोध करण्याचा अधिकार सर्वांना आहे परंतु धादांत खोट्या कथांच्या आधारावर चारित्र्यहनन करण्याचा अधिकार नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) चरणी अवघे आयुष्य अर्पित करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेंना फक्त ब्राह्मण असल्यामुळे हे सर्व सहन करावे लागते. या भूमिकेमुळे संभाजी ब्रिगेड ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच बी टीम आहे असा आमचा दृढ समज झालेला आहे.

आताही गेल्याच महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी (Legislative Council Member Amol Mitkari) यांनी स्त्रियांचा अपमान करणारे ब्राह्मण पुरोहितांचा अपमान करणारे वक्तव्य जाहीर सभेत केले. ब्राह्मण समाजाने अनेक ठिकाणी पोलीस तक्रारी दिल्या परंतु कुठेही त्याविरोधात गुन्हा दाखल झाला नाही कारण ते सत्ता पक्षाचे आमदार आहेत म्हणून त्यांना वेगळा न्याय लावला जात आहे दुसरीकडे एक अभिनेत्री जिचे वय 24 25 असेल म्हणजे ती जन्माला आली तेव्हापासून ती याच प्रकारचे राजकारण पहात असेल तिला एका फेसबुक पोस्टसाठी 13 ठिकाणी गुन्हे व तुरुंगवास भोगावा लागतो आहे खरेतर कायद्याचे अभ्यासक मानतात माहिती तंत्रज्ञान कायदा 2005 च्या कलम 66 ई नुसार सदर गुन्हा अदखलपात्र सदरात मोडतो परंतु गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेस कडे असल्याचा फायदा घेतला जातोय असे आमचे मत झाले आहे कारण पुन्हा एकदा चितळे हे तिचे नाव तिच्यावरची कारवाई जोरात व्हायला कारणीभूत ठरत असावे.

मिटकरी बोलले त्याचे फार वाईट वाटले नाही परंतु लगेच दुसऱ्या दिवशी  शरद पवार याच्या समोर मंत्री छगन भुजबळ देखील असेच बोलले त्यामुळे हीच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे हे आमचे ठाम मत तयार झाले आहे.सबब राष्ट्रवादी कााँग्रेस पक्षाचेआमदार अमोल  मिटकरी याांनी ब्राह्मण समाजाची जाहीर माफी मागावी असेघडलेतर आम्ही जरूर आपली भेट घेऊन चर्चा  करू. असं या पत्रकात म्हटले आहे.