Sharad Pawar | शेतकऱ्यांच्या आत्महत्येला केंद्र सरकार जबाबदार

Sharad Pawar | शेतकऱ्यांच्या आत्महत्येला केंद्र सरकार जबाबदार

Sharad Pawar | शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या दुप्पटीने आत्महत्या वाढल्या आहेत. केंद्र जबाबदार आहे. असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूरच्या बार्शीत आयोजित शेतकरी मेळाव्यातून केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरच्या बार्शीत आज ‘शरद शेतकरी संवाद मेळावा’ पार पडला आहे. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा शरद पवार साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, शेतकऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य दाम मिळत नाही, त्यामुळे शेतकरी बांधव टोकाचे पाऊल उचलत आहेत. सरकारचे शेतकऱ्यांकडे अजिबात लक्ष नाही. तसेच केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना त्यांच्या कामाचे योग्य मोल मिळत नाही, म्हणून त्यांना हे पाऊल उचलावे लागत आहे. तसेच आपल्या शेतकरी बांधवांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, हा पर्याय असल्याचे पवार साहेब यांनी म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की, मराठवाड्यातील जनता आमच्या सोबत आहे. विधानसभेच्या निवडणूकीमध्ये देखील जनता आमच्या सोबत आहे. बार्शीत आणि पंढरपूर या दोन गावात सायंकाळी सभा होतात आणि त्या चांगल्या होतात. आज भर उन्हात तुम्ही इथे उपस्थित आहात, याचा अर्थ आहे. आपण परिवर्तनाच्या दिशेने उभे आहात हे याचे संकेत आहेत. नरेंद्र मोदी यांचा चेहरा राज्यात चालणार नाही असेही शरद पवार साहेब म्हणाले.

पुढे शरद पवार म्हणाले की, आम्ही जात, पात न बघता विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देणार आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने गुलाल उधळला. कोणत्या आधारावर गुलाल उधळला त्यांना विचारा. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देणार आहे असं सांगितलं होतं. ५० टक्केमध्ये आणून आम्ही आरक्षण देणार आहे, आमची नक्कल ते निवडणुकीच्या तोंडावर करत आहेत. असे शरद पवार साहेब यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले की, लोकसभेला ४०० पार म्हणणाऱ्यांना ३०० ही पार करता आले नाहीत. मोठा भाऊ आणि लहान भाऊ असे आमच्यात कोणी नाही, या सरकारला पराभूत करणे हेच आमचे ध्येय आहे. आंध्र आणि बिहारच्या जीवावर केंद्र सरकार सत्तेवर आले आहे. यांची धोरणे बदलायची असेल तर सरकार बदला. अन्याय आणि जुलूम करणारे सरकार खाली खेचा असे आवाहनही शरद पवार साहेब यांनी यावेळी केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Hindenberg Report : हिंडनबर्गच्या नवीन अहवालानंतरचा पहिला ट्रेडिंग दिवस, शेअर बाजार पडू शकतो - सर्वांच्या नजरा

Hindenberg Report : हिंडनबर्गच्या नवीन अहवालानंतरचा पहिला ट्रेडिंग दिवस, शेअर बाजार पडू शकतो – सर्वांच्या नजरा

Next Post
Eknath Shinde | उबाठा गटाचा ठाणे येथील मेळावा संपताच एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंना 'जोर का झटका'...

Eknath Shinde | उबाठा गटाचा ठाणे येथील मेळावा संपताच एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंना ‘जोर का झटका’…

Related Posts
Tejinder Singh Tiwana | पाकिस्तान आणि कसाबला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसचा जाहीर निषेध

Tejinder Singh Tiwana | पाकिस्तान आणि कसाबला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसचा जाहीर निषेध

Tejinder Singh Tiwana | पाकिस्तान समर्थक काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार (Vijay Vaddetiwar) यांनी दहशतवादी अजमल…
Read More
रवींद्र धंगेकरांनी शिवसेनेत प्रवेश करताच एकनाथ शिंदे म्हणाले, “आता कळेल हू इज धंगेकर…”

रवींद्र धंगेकरांनी शिवसेनेत प्रवेश करताच एकनाथ शिंदे म्हणाले, “आता कळेल हू इज धंगेकर…”

पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar) यांनी आज उपमुख्यमंत्री…
Read More
Janhvi Kapoor | मासिक पाळीदरम्यान दर महिन्याला बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप करायचे, अभिनेत्री जान्हवी कपूरचा खुलासा

Janhvi Kapoor | मासिक पाळीदरम्यान दर महिन्याला बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप करायचे, अभिनेत्री जान्हवी कपूरचा खुलासा

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. जान्हवी कपूर शिखर पहाडियाला डेट…
Read More