Sharad Pawar | राज्यात ४६ लाख सहा हजार कृषिपंपधारक शेतकऱ्यांची वीज बिल माफी देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेची घोषणा अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. साडेसात अश्वशक्ती कृषिपंप वापरणाऱ्या शेतक-यांना या वीज बिल माफीचा फायदा होणार आहे. पुढील वीज बिलापासून ही वीजबिल माफी मिळणार आहे. याकरिता १४ हजार, ७६१ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सरकारच्या या योजनेवरुन शरद पवार (Sharad Pawar) यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कान टोचले आहेत.
सरकारने वीज फुकट देण्याचे जाहीर केलं आहे. त्यामुळे आता पंप बंद करायला कोण जाईल का? सरकारने दिलेल्या सवलतीचा गैरवापर करू नका असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठा संस्थेच्या कार्यक्रमात बोलतांना शरद म्हणाले, एकदा ऊसाची लागवड केली की नंतर थेट ऊस कारखानाला घालवायलाच शेतकरी उसाकडे लक्ष देतो आणि जगाच्या राजकारणाची चर्चा करत बसतो. मात्र, शेतीच्या गुणवत्तेकडे लक्ष देत नाही. शेतीची उत्पादकता टिकवण्यासाठी जमिनीतचा पोत सुधारण्याचा कार्यक्रम शेतकऱ्यांनी हाती घेतला पाहिजे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Union Budget | संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैपासून,’या’ दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार
Supriya Sule | भाजप म्हणजे भ्रष्टाचार जुमला पार्टी आहे ;सुप्रिया सुळे यांचा आरोप
Nana Patole | नरेंद्र मोदी देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार, वायकरही भाजपाच्या वॉशिंग मशिनमधून स्वच्छ