शरद पवार सर्वांचे नाहीत, ते केवळ मराठ्यांचे नेते; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

शरद पवार सर्वांचे नाहीत, ते केवळ मराठ्यांचे नेते; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

Prakash Ambedkar | महाराष्ट्रातील आदिवासी समाज जो गडचिरोलीपासून सिंधुदुर्ग ते पालघरपासून नांदेडच्या टोकापर्यंत आहे, तो वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. त्याला एकत्रित करण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीने केला. आनंदाची बाब अशी की, यातील वेगवेगळ्या संघटना आणि राजकीय पक्षांनी एकत्रित राहण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची पहिली सभा आपण चोपडा येथे घेत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे आदिवासी सत्ता संपादन हक्क परिषदेत सांगितले.

विदर्भात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, अमरावती, बुलढाणा, जळगाव-जामोद, तेल्हारा या भागात 22 टक्के आदिवासी समाज राहतो, तरी सुद्धा राजकीय पक्ष आदिवासींना राजकीय प्रतिनिधीत्व द्यायला तयार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आदिवासी आरक्षित मतदारसंघात तर आम्ही लढणार, पण ज्या मतदारसंघात आदिवासींची लोकसंख्या आहे त्या जागा सुद्धा महाराष्ट्रात आदिवासी पहिल्यांदा  लढणार असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी नमूद केले.

ॲड. आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले की, महाराष्ट्राचे राजकारण हे पैशाचे राजकारण झाले आहे. भाजप, काँगेस, शिवसेना, राष्ट्रवादी, उमेदवारी द्यायचे असेल तर  बोली बोलावी लागते, राजकारणात कार्यकर्त्यांचे कर्तुत्व बघितले जात नाही तर किती पैसे खर्च करणार हे विचारले जाते जो उमेदवार जास्त खर्च करेल त्याला उमेदवारी दिली जाते. आम्ही संविधान वाचवतो असा काँग्रेसने नारा दिला. त्यामुळे काँग्रेसला, शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला लोकांनी मतदान केले आणि आज त्यांची भूमिका ही आरक्षण काढून घेण्याची आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा SC-ST आरक्षणात क्रिमीलेयर लागू करण्याचे काम करत आहे. एका कुटुंबाने एकदा आरक्षणाचा लाभ घेतला की यापुढे आरक्षण मिळणार नाही. म्हणजेच आरक्षणातून बाद होईल. हा निर्णय भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, शिवसेना (उबाठा) लागू करणार आहे असे म्हणत आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर हल्ला चढवला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवार यांच्यावर ही ॲड. आंबेडकरांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, जरांगे पाटील यांची मागणी आहे की, ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यावर शरद पवारांनी विधान केले की, राष्ट्रवादीचा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे, त्यामुळे शरद पवार हे सर्वांचे नेते राहिलेले नाहीत तर ते मराठा समाजाचे नेते आहेत.

ओबीसी आरक्षणात मराठा समाज आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे अशी वंचितची भूमिका आहे. सरकारला मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यायला कोणी थांबवले आहे, पण यांना गरीब मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही तर यांना भांडणे लावायची आहेत असे म्हणत त्यांनी राज्य सरकारचाही समाचार घेतला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पुण्याची वाहतूक कोंडी सोडविणे ही राज्य सरकारची जबाबदारी | CM Eknath Shinde

‘महाराष्ट्र विधानसभा २०२४ विजय संकल्प संमेलना’चे मुंबईत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

उद्योगस्नेही धोरणामुळे परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर | Uday Samant

Previous Post
रोहितच्या नेतृत्वाखाली भारताचा 'विराट' पराक्रम, बांगलादेशला व्हाईटवॉश देत केला अविश्वसनीय विक्रम | IND VS BAN

रोहितच्या नेतृत्वाखाली भारताचा ‘विराट’ पराक्रम, बांगलादेशला व्हाईटवॉश देत केला अविश्वसनीय विक्रम | IND VS BAN

Next Post
ठाकरे गट भाजपची जवळीक वाढली? संजय राऊतांनी नड्डांची भेट घेतल्याचा दावा

ठाकरे गट भाजपची जवळीक वाढली? संजय राऊतांनी नड्डांची भेट घेतल्याचा दावा

Related Posts
मंत्रिमंडळात स्थान देण्यापूर्वी शिंदे गटाच्या आमदारांचे रिपोर्ट कार्ड कसे आहेत? दोघांच्या कामात घट

मंत्रिमंडळात स्थान देण्यापूर्वी शिंदे गटाच्या आमदारांचे रिपोर्ट कार्ड कसे आहेत? दोघांच्या कामात घट

Shinde group | महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे 13-14…
Read More
IPL 2024 च्या लिलावात 'हा' खेळाडू ठरणार सर्वात महागडा? विश्वचषकात खोऱ्याने ओढल्यात धावा

IPL 2024 च्या लिलावात ‘हा’ खेळाडू ठरणार सर्वात महागडा? विश्वचषकात खोऱ्याने ओढल्यात धावा

IPL History Most Expensive Player: विश्वचषक संपल्यानंतर आयपीएलबाबत (IPL 2024) चर्चा सुरू झाल्या आहेत, मात्र आयपीएलमध्येही वर्ल्डकपचा ​​प्रभाव…
Read More
Supriya Sule | आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही, आम्ही भ्रष्टाचारातून मुक्त झालो; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

Supriya Sule | आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही, आम्ही भ्रष्टाचारातून मुक्त झालो; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

Supriya Sule | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात येऊन त्यांनी बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर एक चकार शब्ददेखील काढला नाही केंद्र…
Read More