शिवसेना-धनुष्यबाण वादात शरद पवारांनी केले हात वर; म्हणाले,…
Shivsena : शिवसेना (Shivsena) हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला आहे. (The Central Election Commission has decided to give the name Shiv Sena and the symbol Dhanushyaban to the Shinde group) . हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे तर शिंदे गटाचा आनंद आता गगनात मावत नसल्याचे चित्र आहे.
यावर आज शरद पवार यांनी स्पष्टच शब्दात आपली भूमिका स्पष्ट केली. त्या वादात मी पडणार नसल्याचं शरद पवार यांनी सागितलं. शिवसेना आणि धनुष्यबाण यावरून राज्यात सध्या सुरू असलेल्या वादात मी पडणार नाही. मी त्याबाबत परवाच माझी भूमिका स्पष्ट केली आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनुष्यबाणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्टच सांगितली.