‘छत्रपती संभाजी महाराज ‘स्वराज्यरक्षक’च, त्यांनी स्वराज्यावरील अनेक हल्ले परतावून लावले’

Kolhapur  – छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) नावाआधी ‘धर्मवीर’ उपाधी लावायची की ‘स्वराज्यरक्षक’ यावरून महाराष्ट्रात मोठे वादंग निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सर्वप्रथम ‘संभाजीराजे धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक होते’ असा दावा केला. त्याला भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध केल्यामुळे हा विषय पेटला. अजित पवारांविरोधात राज्यभर आंदोलन करत भाजपने संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होतेच, पण ते धर्मवीरही होते असे म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोल्हापुरात भूमिका स्पष्ट केली. पवार यांनी (Sharad Pawar on Sambhaji Maharaj) छत्रपती संभाजी महाराज ‘स्वराज्यरक्षक’च असल्याचे सांगितले, ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक म्हणून यामध्ये काहीही चुकीचे नाही. संभाजी महाराज यांनी स्वराज्यावर आलेले अनेक हल्ले परतवून लावले आहेत.असं त्यांनी म्हटले आहे.