‘शरद पवारांनी युक्रेनमधील विद्यार्थ्यांऐवजी लवासातील गफल्यावर बोलावं’

मुंबई – पुण्यात अनेक महत्त्वाचे प्रकल्प येत असून उदघाटनाचे कार्यक्रमही होत आहेत. या महत्त्वाच्या कार्यक्रमासोबतच युक्रेनमधील मुलांची सोडवणूक करणेही अधिक महत्त्वाचे आहे, असे सांगतानाच देशाची सुत्रे ज्यांच्याकडे आहेत, ते याची गांभीर्याने दखल घेतात का? हा महत्वाचा सवाल आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काल पुणे येथे पत्रकारांशी बोलताना मांडले.

केंद्र सरकार या मुलांना परत आणण्यासाठी जे जे करता येईल, ते करण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही अजून विद्यार्थी तेथे आहेत. विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर युक्रेनच्या सीमेबाहेर येता येईल असा प्रयत्न करा असे भारतीय दुतावासाकडून त्यांना सांगितले जात आहे मात्र मुलांचे म्हणणे आहे की, युक्रेनच्या सीमेवर जाण्यासाठी पाच ते सहा तास चालावं लागेल. त्यात भयंकर थंडी आहे, तर दुसरे म्हणजे तिथे हल्ले होत आहेत, गोळीबार होत आहे. त्यामुळे विद्यार्थी अकडले आहेत हेही शरद पवार यांनी सांगितले.

दरम्यान, पवार यांनी हा सल्ला दिल्यानंतर आता भाजपने पवारांना फैलावर घेतले आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पवार यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, शरद पवार युक्रेनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला देतायत. तेथील विद्यार्थ्यांबाबत चिंता व्यक्त करतायत. ते सुरज जाधवच्या आत्महत्येबाबत बोलत नाहीत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी त्यावर बोलावं, शेतकऱ्यांच्या हलाखीवर, लवासातील घपल्यावर बोलावं.

https://twitter.com/BhatkhalkarA/status/1500103205635891200s=20&t=Y5RfKBzQU4DT2RUam61Hcg