Prakash Ambedkar: शरद पवार, उध्दव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील! प्रकाश आंबेडकरांचा दावा

Prakash Ambedkar: शरद पवार किंवा उध्दव ठाकरे यांना निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षासोबत जाण्याशिवाय दुसरा मार्ग नसल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रचार सभेत केले. ते वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, या दोन्ही नेत्यांच्या चौकशा चालू आहेत आणि त्यामुळे यांना पर्याय नाही. उद्या NRC, CAA, हिजाब किंवा औरंगजेबचा मुद्दा असेल त्यावर राष्ट्रवादीचा निवडून दिलेला खासदार त्या सभागृहात बोलणार का ? तर अजिबात नाही.

काल मुंबईमध्ये शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभा होत्या त्यावर देखील आंबेडकरांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, एकदंरीत आपण पाहिले की, काल मुंबईत दोन तमाशे झाले एक शिवाजी पार्क येथे झाला आणि दुसरा बीकेसी मैदानावर झाला. एकमेकांना शिव्या घालण्याच्या पलीकडे त्यांच्याकडे काहीच नव्हते. पुढील पाच वर्षांत काय करणार? याबाबतचा त्यांच्याकडे कोणताही कार्यक्रम नव्हता.

पंतप्रधनाचे कार्यालय हे मानवतेचे कार्यालय असले पाहिजे, ते मानवतेचे कार्यालय न राहता आता ते वसुलीचे कार्यालय झाले आहे आणि या वसुलीमुळे २०१४ पासून १७ लाख कुटुंब की, ज्यांची मालमत्ता ५० कोटींच्या वरती आहे त्यांनी भारतीय नागरिकत्व सोडले आणि परदेशात स्थायिक झालेत. ही सरकारी आकडेवारी आहे. तुम्हाला मानवतेचा पंतप्रधान पाहिजे की, वसुली करणारा पंतप्रधान पाहिजे हे तुम्हाला ठरवण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप