Gopichand Padalkar | महाराष्ट्रातील धनगर समाज लोकशाही विरोधात आहे असे वातावरण तयार केले. 100 शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आला आहे. या मतदारसंघात 100 गावं आहेत पण हेच गाव निवडले. कारण धनगर समाज लोकशाही मानत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न शरद पवाराने केले, असा एकेरी उल्लेख गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. विधानसभेच्या निकालात घोटाळा असून ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यावरुन मारकवाडीतील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यावरुन मारकडवाडी गावात आज महायुतीची सभा होत आहे. या सभेवेळी जतचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) बोलत होते.
नरेंद्र मोदींचे ‘खरे’ चप्पल घालून बाहेर पडेपर्यंत राहुल गांधींचे खोटे गावभर फिरून येते. तसेच देवभाऊचे खरे बाहेर पडेपर्यंत शरद पवार यांचे खोटे गावभर फिरून येते. मारकडवाडीत पवार आले तेव्हापासून शरद पवारांची अक्कल आता संपली आहे. शरद पवारांना आवाहन आहे की, त्यांनी निवडणुका कश्या होतात. त्याबाबत आमदारांचे प्रशिक्षण घ्यावे आणि मैदानात यावे. ईव्हीएममध्ये घोळ कसा झाला ते सांगावे, असं पडळकरांनी म्हटलंय.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना धक्का
“गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालून…”, वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात
पवारांचा खोटारडेपणा म्हणजे संविधानाचा अपमान! बावनकुळे यांची टीका