Sanjay Raut| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ९८ व्या अखिल भारतीय मराठी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना त्यांच्या जागेवर बसण्यास मदत केली. तसेच त्यानंतर त्यांनी एक ग्लास पाणी देऊन सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी समोर बसलेल्या प्रेक्षकांनी मोठ्याने टाळ्या वाजवल्या. पंतप्रधान मोदी दीपप्रज्वलन करून समारंभाची सुरुवात करणार होते. यावेळी त्यांनी कार्यक्रमाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष पवार यांना पुढे येण्याची विनंती केली. यानंतर शरद पवार एनडीए आघाडीत सामील होतात की काय? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
आता या सर्व प्रकरणावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, स्वागताध्यक्ष व्यक्तीला शिष्टाचार पाळावा लागतो. शरद पवारांचा स्वभाव पाहता त्यांचं चांगलं भाषण झालं.
दरम्यान, शरद पवारांना मोदींनी खुर्ची आणि पाणी दिल्याच्या घटनेवर बोलताना ते म्हणाले, मी या घटनेकडे तटस्थपणे पाहतो. दुसरं कोणी असतं तर त्यांनी देखील हेच केलं असतं. राहुल गांधी देखील खर्गेंना पाणी देतात, शिवसेनाप्रमुख यायचे त्यांना देखील आम्ही त्यांना खुर्ची द्यायचो. शरद पवारांचं जे राजकारणातलं स्टेटस ते मोदींपेक्षा मोठं आहे. पंतप्रधान असल्यामुळेच किंवा पद असल्यामुळे ठीक आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
वाघाचे कातडे पांघरुन लांडगा वाघ होत नाही, उपमुख्यमंत्री शिंदे यांचा उबाठावर हल्लाबोल
‘हिंमत असेल तर गंगेतील पाण्याचा एक घोट पिऊन दाखवा’, बॉलीवूड गायकाचं थेट योगींना आव्हान
गजा मारणेच्या गुंडांकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण; मुरलीधर मोहोळ यांचा संताप