Share Market : गेल्या आठवड्यात सेन्सेक्सच्या (Sensex) टॉप 10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी सहा कंपन्यांचे बाजार भांडवल (मार्केट कॅप) एकत्रितपणे 1,85,186.51 कोटींनी वाढले. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) आणि इन्फोसिसचे शेअर्स सर्वाधिक वाढले.
एलआयसीचे बाजार मूल्यांकन 44,907.49 कोटी रुपयांनी वाढून 7,46,602.73 कोटी रुपये झाले. इन्फोसिसचे बाजार भांडवल रु. 35,665.92 कोटींनी वाढून रु. 7,80,062.35 कोटी झाले. ITC चे बाजार भांडवल रु. 35,363.32 कोटींनी वाढून रु. 6,28,042.62 कोटी झाले.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे मूल्यांकन 30,826.1 कोटी रुपयांनी वाढले आणि ते 15,87,598.71 कोटी रुपयांवर पोहोचले. भारती एअरटेलचे बाजार भांडवल 30,282.99 कोटी रुपयांनी वाढून 8,62,211.38 कोटी रुपये झाले. एचडीएफसी बँकेचे मूल्यांकन 8,140.69 कोटी रुपयांनी वाढून 12,30,842.03 कोटी रुपये झाले.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल 62,008.68 कोटी रुपयांनी घसरून 20,41,821.06 कोटी रुपयांवर आले. ICICI बँकेचे मूल्यांकन 28,511.07 कोटी रुपयांनी घसरले आणि ते 8,50,020.53 कोटी रुपयांवर आले. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे बाजार भांडवल 23,427.1 कोटी रुपयांनी घसरून 7,70,149.39 कोटी रुपये झाले. हिंदुस्थान युनिलिव्हरचे मूल्यांकन 3,500.89 कोटी रुपयांनी घसरून 6,37,150.41 कोटी रुपयांवर आले. सेन्सेक्सच्या टॉप 10 कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे. यानंतर TCS, HDFC बँक, भारती एअरटेल, ICICI बँक, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, LIC, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि ITC यांचा क्रमवारीत क्रमांक लागतो.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप