शर्जील इमामला देशद्रोहाच्या खटल्यात जामीन मिळाला, पण तरीही तुरुंगातच राहावे लागणार

नवी दिल्ली – दिल्लीतील एका न्यायालयाने शुक्रवारी शर्जील इमामला (Sharjeel Imam) देशद्रोहाच्या खटल्यात जामीन मंजूर केला. शरजीलवर 2019 मध्ये जामियामध्ये दंगल भडकवल्याचा आरोप होता. मात्र तरीही जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) माजी विद्यार्थी असणाऱ्या शरजील इमामला सध्या तुरुंगातच राहावे लागणार आहे, कारण त्यांना दिल्ली जातीय दंगलीच्या कट प्रकरणात अद्याप जामीन मिळालेला नाही.

न्यायालयाने म्हटले की, 22 ऑक्टोबर 2021 चे निरीक्षण देखील नोंदवले की इमामचे भाषण ऐकल्यानंतर दंगलखोरांनी कारवाई केल्याचा कोणताही पुरावा नाही.अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनुज अग्रवाल म्हणाले,हे लक्षात घेऊन आणि सध्याच्या खटल्याच्या गुणवत्तेवर भाष्य न करता, अर्जदार किंवा आरोपी शर्जील इमामला 30,000 रुपयांच्या जामीनासह तत्सम रकमेच्या वैयक्तिक जामिनावर जामीन मंजूर केला जातो आहे.न्यायाधीशांनी सांगितले की, इमाम नेहमी मोबाईलवर उपलब्ध असेल आणि पत्त्यातील बदलाबाबत संबंधित तपास अधिकाऱ्याला (IO) माहिती देईल या अटीवर जामीन मंजूर केला जातो आहे.

दरम्यान, हा आरोपी 31 महिन्यांहून अधिक काळ कोठडीत आहे आणि सध्याच्या प्रकरणात 17 फेब्रुवारी 2020 रोजी अटक करण्यात आली होती. इमामला त्याच्या कथित चिथावणीखोर भाषणाने जामियामध्ये दंगल भडकवल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केली होती. तपासादरम्यान, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 124A आणि 153A लावले होते. इमामवर आयपीसीच्या विविध तरतुदींखाली दंगल करणे, प्राणघातक शस्त्राने सज्ज असणे, सार्वजनिक सेवकाला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी प्राणघातक हल्ला करणे, खुनाचा प्रयत्न करणे अशा अनेक कलमांखालीही आरोप ठेवण्यात आले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांतर्गतही आरोप निश्चित करण्यात आले आहेत.