अक्षय भूमकर प्रकरणावरून शर्मिला येवले यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर तोफ डागली

बीड: युवासेनेच्या वरिष्ठ नेत्याच्या जाचास कंटाळून अंबाजोगाई युवासेना तालुका प्रमुखाने विषारी किटकनाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. अक्षय भूमकर (वय २५) (Akshay Bhumkar)असं या तालुका प्रमुखाचं नाव आहे. बुधवारी रात्री उशीरा सोबतच्या मित्रांमुळे हा प्रकार उघडकीस आला. अक्षय भूमकर याच्यावर सध्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, या मुद्द्यावरून युवसेनेच्या नेत्या शर्मिला येवले यांनी ठाकरे गटाच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे. त्या म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील अक्षय भुमकर माने या युवकाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही बातमी आज प्रसार माध्यमांमधून समोर आली हीच का खरी आदित्यजींची युवा सेना जी सामान्य कार्यकर्त्यांना आत्महत्या प्रवृत्त करते.

नेता हा सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांचे अडचणी जाणून समजून घेणार असतो आदित्य ठाकरे यांना वारंवार त्यांनी पत्रव्यवहार करूनही त्याची दखल वरिष्ठांनी घेतली नाही.ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते सामान्य कार्यकर्त्यांचा आर्थिक व्यवहारात वापर करताना दिसून येत आहेत ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे आणि यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि अक्षय माने यांना आत्महत्यास प्रवृत्त करण्यामागे ज्या ज्या लोकांचा हात आहे त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि अक्षय माने हा प्राथमिक स्वरूपातील पदाधिकारी देखील असू शकतो कारण असे असंख्य पदाधिकारी ह्या सगळ्या त्रासातून जात आहेत परंतु वरिष्ठ नेत्यांचा अजिबात यावर लक्ष नसल्याचं दिसून येत.असं येवले यांनी म्हटलं आहे.