आयारामांच्या भवरश्यावरच उद्धव ठाकरे नेतआहेत आपला पक्ष पुढे; शीतल म्हात्रेंनी दिलेली यादी एकदा पहाच 

मुंबई : शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. एका गटाचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत तर दुसऱ्या गटाचं नेतृत्व हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. ठाकरे गटात शिल्लक असणाऱ्या नेत्यांपैकी अनेक नेते  इतर पक्षातून आलेले आयाराम आहेत. अशा आयारामांच्या भवरश्यावरच उद्धव ठाकरे आपला पक्ष पुढे नेताना दिसत आहेत. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटातील या आयारामांची एक यादीच दिली आहे.

ठाकरे गटाचे निष्ठावंत सैनिक… शीतल म्हात्रेंनी दिलेली यादी

सचिन अहिर- राष्ट्रवादी

सुषमा अंधारे – राष्ट्रवादी

भास्कर जाधव – राष्ट्रवादी

वैभव नाईक – काँग्रेस

मनिषा कायंदे – भाजप

प्रियंका चतुर्वेदी – काँग्रेस

संजना घाडी – मनसे

राहुल कानाल – काँग्रेस

साईनाथ दुर्गे – मनसे

ही यादी दिल्यानंतर शीतल म्हात्रे यांनी अजून कोण उरलंय? असा सवालही केला आहे.