शीतल, तू लढ; आम्ही सोबत आहोत – चित्रा वाघ  

मुंबई– राजकीय क्षेत्रातून एक अत्यंत संतापजनक घटना पुढे आली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत सामील झाले होते. या रॅलीतील शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा व्हिडीओ मॉर्फ करून त्यावर अश्लील मजकूर करून व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेतून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष  चित्रा वाघ यांनी आज शीतल म्हात्रे यांच्यासाठी विशेष संदेश दिला आहे. एखादी महिला प्रगती करत असेल. तिला थांबवता येत नसेल तेव्हा अशा प्रकारच्या विकृतींद्वारे तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. पण शीतल म्हात्रे यांनी हिंमतीने लढावं, आम्ही सगळ्या तुझ्या पाठिशी आहोत, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली आहे.