शेवंता येतेय एका नव्या कलाकृतीमधून प्रेक्षकांच्या भेटीला

Pune – रात्रीस खेळ चाले ह्या मालिकेमध्ये मध्ये शेवता (Shevanta), स्वराज्यसौदामिनी ताराराणी ह्या मालिकेमध्ये राणी चेनम्मा अश्या प्रसिद्ध भूमिका साकारलेली सगळ्यांची लाडकी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar)आता स्वयंभू स्टुडीओसच्या नव्या कलाकृतीमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, द डीलीवरी बॉय (The Delivery Boy)असे ह्या कलाकृतीचे नाव आहे. ह्यात अपूर्वा नेमळेकर सोबतच सुजीत देशपांडे (Sujit Deshpande) हे मुख्य भूमिकेत आहेत, ह्याचे लेखन शैलेश देशपांडे (Shailesh Deshpande)ह्यांनी केले असून निर्मिती सुजित देशपांडे ह्यांनी केली आहे तर दिग्दर्शन अभिषेक रत्नपारखी (Abhishek Ratnparkhi)आणि सुजित देशपांडे ह्यांनी केले आहे.

आदित्य ठोसर निर्मितीप्रमुख आहेत तर छायाचित्रकार नितीन जाधव साहिल ढोले (Sahil Dhole) हे संकलक म्हणून काम बघत आहेत. ऋषिकेश कुलकर्णी (Rushikesh Kulkarni) ह्यांनी सहदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच कमलेश बीचे ह्यांनी रंगभूषा, समृश्धी वाळवेकर हिने वेशभूषा आणि सेजल चव्हाण हिने केशभूषा केली आहे. ह्याचे चित्रीकरण नुकतेच पुण्यात झाले..

स्वयंभू स्टुडीओस (Swayambhu Studios)  ह्या निर्मिती संस्थेने आत्तापर्यंत अनेक माहितीपटांची आणि महाराष्ट्र पोलिसांना मानवंदना म्हणून मामा ह्या लघुपटाची निर्मिती केली होती. प्रसिद्ध असलेल्या platforms वर झळकली आणि प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. आता हि नवी कलाकृती सुद्धा प्रेक्षकांना नक्की आवडेल.