Uday Samant | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपवण्यासाठी भाजपने नवा डाव आखला आहे. शिंदे यांना बाजूला करून उद्या नवा उदय समोर येईल, असे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. यावर आता खुद्द उदय सामंत यांची प्रतिक्रिया आली आहे.
या सगळ्या चर्चां धादांत खोट्या असल्याचं शिवसेनेचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य मी ऐकलं आहे. हा राजकीय बालिशपणा आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जो उठाव केला त्यात मी सामील होतो आणि त्याचमुळं मला राज्याचे दोनदा उद्योगमंत्रीपद मिळालं याची मला पूर्णपणे जाणीव आहे. अशा सर्वसामान्य नेत्याने माझ्या राजकीय जीवनासाठी मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत. ते मी कधीच विसरु शकत नाही, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.माझे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध राजकारणापलीकडचे आहेत. त्यामुळं कोणीही आमच्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही,’ असं देखील सामंत यांनी म्हटलं आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
पुण्यामध्ये पुनश्च एकवार नॅशनल गेम्सचे आयोजन होण्यासाठी प्रयत्न करणार – MP Mohol
शिक्षण विभागाकरीता आखण्यात आलेल्या १० कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- Dada Bhuse