शिंदे गटाला एनडीएच्या बैठकीचं निमंत्रण; दीपक केसरकर दिल्लीला जाणार

Mumbai – शिवसेनेच्या (Shivsena) खासदारांनी मातोश्रीवर (Matoshree) झालेल्या बैठकीत एनडीएच्या (NDA) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. याबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुढील दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भविष्यात भाजप आणि शिंदेशी जुळवून घ्या अशी या खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे तर राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू  (Draupadi Murmu)यांना पाठिंबा दिला तर चर्चेची भाजपसोबत (BJP)दारं उघडी राहतील असंही त्यांनी कालच्या बैठकीत सांगितले आहे.

दरम्यान, राष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात एनडीएने बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी शिंदे गटाला निमंत्रण देण्यात
आले आहे. आता या बैठकीला शिंदे गट सहभागी होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून दीपक केसरकर दिल्लीला जाणार आहेत. एनडीएच्या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरणार आहे.