शिंदे गटाचे एक पाऊल पुढेच; आता सुप्रीम कोर्टात केलं कॅव्हेट दाखल

Shivsena : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला आहे. (The Central Election Commission has decided to give the name Shiv Sena and the symbol Dhanushyaban to the Shinde group) . हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे तर शिंदे गटाचा आनंद आता गगनात मावत नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सोमवारी सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. याआधीच एकनाथ शिंदे यांच्या कडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आलंय. (Eknath Shinde filed a caveat in the Supreme Court). आपली बाजू ऐकल्याशिवाय सुप्रीम कोर्टाने निर्णय घेऊ नये अशी विनंती एकनाथ शिंदेंनी सुप्रीम कोर्टात केलीय. निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयावर ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच एकनाथ शिंदेंनी कॅव्हेट दाखल केले आहे.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाकडून भाजपसह शिंदे गटावर चौफेर टीका केली जात आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट करत थेट निवडणूक आयोगावरच तोफ डागली आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला आहे. तसेच, हा प्राथमिक आकडा असून 100 टक्के सत्य असल्याचा दावाही संजय राऊतांनी केला आहे.