Shivsena : शिंदे गटाचंही चिन्ह ठरलं?’या’ चिन्हांना असेल प्राधान्य

मुंबई – शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ हे निवडणूक चिन्ह (sign) गोठवण्याचा हंगामी आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा जारी केला. यानंतर आता उद्धव ठाकरे गटाकडून आपल्या निवडणूक चिन्हासाठी उगवता सूर्य, त्रिशूळ आणि मशाल या चिन्हांचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच पक्षाच्या नावासाठी तीन पर्याय देण्यात आले असून त्यामध्ये बाळासाहेबांच्या नावाचा समावेश आहे.

दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाकडून आज (10 ऑक्टोबर) एक परिपत्रक जारी करुन निवडणूक चिन्हावर आपली भूमिका मांडण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिंदे गटाची महत्त्वाची बैठक रविवारी (9 ऑक्टोबर) संध्याकाळी पार पडली. यावेळी पक्षाच्या चिन्हाबाबत पक्षाच्या कार्यकारिणीने निर्णय घ्यावा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याचं समजतं. तसंच शिंदे गटाकडून तुतारी, गदा आणि तलवार या चिन्हांना प्राधान्य देण्यात आलं असून याबाबत सोमवारी (10 ऑक्टोबर) निवडणूक आयोगाला माहिती देण्यात येणार आहे.तसेच पक्षाच्या नावासाठी तीन पर्याय देण्यात आले असून त्यामध्ये बाळासाहेबांच्या नावाचा समावेश आहे असं देखील सांगितले जात आहे.