आनंद दिघेंबाबत झालेल्या राजकारणाचाही लवकरच खुलासा करणार, शिंदेंचा ठाकरेंना आता थेट इशारा

Malegoan – मी मुलाखत देईन त्या दिवशी राज्यात भूकंप होईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मालेगावातून दिला आहे. सोबतच आनंद दिघे (Anand Dighe) यांच्याबाबत राजकारण झाले. त्याचा खुलासा लवकरच करणार असल्याचे शिंदे म्हणाले आहेत.

माझ्यातील ज्या गोष्टी आहेत, त्या मी आज सांगणार नाही. मात्र एक दिवस मलाही तोंड उघडावे लागेल, मलाही भूकंप करावा लागेल, असा इशारा ठाकरेंना दिला. मी कधीही कोणावर खालच्या भाषेत बोलत नाही, मात्र अन्याय झाला तर सहन करणार नाही, असे ते म्हणाले. आनंद दिघेंबाबत झालेल्या राजकारणाचाही लवकरच खुलासा करणार, असा इशारा त्यांनी दिला.