शितल म्हात्रे व्हिडीओ प्रकरण: व्हिडीओ फॉरवर्ड करुन व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक

मुंबई– राजकीय क्षेत्रातून एक अत्यंत संतापजनक घटन पुढे आली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत सामील झाले होते. या रॅलीतील शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा व्हिडीओ मॉर्फ करून त्यावर अश्लील मजकूर करून व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेतून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, व्हिडीओ फॉरवर्ड करुन व्हायरल करणाऱ्या दोघांना दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. शीतल म्हात्रे यांनी हा व्हिडीओ मॉर्फ व्हिडीओ असल्याचा आरोप करत दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अशोक मिश्रा आणि मानस कुवर असं या अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत.

आपली बदनामी करण्यासाठी हा खोटा व्हिडीओ तयार करण्यात आला असून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा यामागे हात असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केलाय. रविवारी पहाटे शीतल म्हात्रे यांनी याबाबत दहिसर पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर हा व्हिडीओ फॉरवर्ड करून व्हायरल करणाऱ्या दोघांना दहिसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.