शिवसेना- भाजपला रोखण्यासाठी अखेर ठाकरेंनी ‘ते’ अस्त्र बाहेर काढलेच; विरोधकांची आता खैर नाही

मुंबई – आज मातोश्री मुंबई येथे ठाकरे गट – संभाजी ब्रिगेड समन्वय समितीची( Shivsena UBT- Sambhaji Brigade Coordination Committee) बैठक झाली. बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने मुंबई मध्ये महाराष्ट्रातील सेना – ब्रिगेड पदाधिकारी संयुक्त मेळावा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करणे, महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी होणारे प्रयत्न हाणून पाडण्यासाठीची रणनीती व पुढील राजकीय दिशा यावर प्रामुख्याने भर होता.

संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धवजी ठाकरे म्हणाले, सध्या आर.एस.एस, भाजपा जातीय व धार्मिक दंगली घडून अनन्याचा प्रयत्न करत आहे. त्या थांबविण्याचे काम संभाजी ब्रिगेडच करू शकते. यापूर्वीही अनेक वेळा ते काम संभाजी ब्रिगेडने चांगल्या प्रकारे केले असून तुमच्यावर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे आताही तुम्ही त्यासाठी पुढाकार घ्यावा अशी आमची इच्छा आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सोबत बैठकीत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॕड. मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे, प्रदेश प्रवक्ते शिवानंद भानुसे व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते  सुभाष देसाई, आदित्य ठाकरे व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे उपस्थित होते.