Shiv Sena : शिवाजी पार्कवरील शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा यंदा खंडित होणार?

मुंबई : शिंदे गटाकडून शिवसेनेचा (Shiv Sena) ‘दसरा मेळावा’ (Dasara Melava) हायजॅक करण्याच्या तयारी सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

मुंबई महापालिकेकडून (BMC) मेळाव्याला परवानगी मिळावी, यासाठी शिवसेनेनं अर्ज दाखल केला असताना, महापालिकेनं मात्र हात आखडता घेतल्याची माहिती मिळत आहे. दहीहंडी उत्सावाच्या वेळी वरळीचं जांबोरी मैदान पटकावून भाजपने शिवसेनेवर (Shiv Sena) कुरघोडी केली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता दसरा मेळाव्याच्यावेळी होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्कात होतो. यंदा शिवसेनेची ही परंपरा खंडित होण्याची चिन्हे दिसत आहेत. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान (shivaji park) मिळावं म्हणून शिंदे गटही सक्रिय झाला आहे. दादरला दसरा मेळावा घेऊन आपणच खरी शिवसेना असल्याचं शिंदे गटाला ठसवायचं आहे. शिवाय महापालिका निवडणुका असल्याने दसरा मेळाव्यातूनच (dussehra rally) शिंदे गट निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची चिन्हे आहेत.