‘शिवसेनेने हिंदूत्वाचा लेंगा घातला आहे… ज्याच्या नाड्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हातात आहेत…’

cm

मुंबई – मुंबईत ‘बेस्ट’ बसच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचे (National Common Mobility Card)  लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत झाले. यानिमित्ताने हिंदुत्व, हनुमान चालिसा (Hanumaan Chalisa) अशा विविध मुद्द्यांचा समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला.  विरोधकांवर सडकून टीका करतांना लवकरच जाहीर सभा घेणार असल्याचं ठाकरे यांनी यावेळी जाहीर केलं.

यावेळी विरोधकांचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ‘हिंदुत्व (Hindutva)  म्हणजे धोतर नाही, घालावं आणि सोडावं, बाबरी पाडली तेव्हा बिळात होतात. मला घंटाधारी हिंदुत्व नको आमचं गदाधारी हिंदुत्व आहे. लवकरच मी सभा घेणार आणि मास्क (Mask)  बाजूला ठेवून मी बोलणार आहे.हे जे नकली हिंदुत्ववादी आलेत त्यांचा मला समाचार घ्यायचाय. ज्यांच्या पोटात मळमळत आहे, जळजळत आहेत, त्यांनी त्यांच्या राज्यात किती विकास केला हे सांगा, आम्ही त्यांना काडीची किंमत देत नाही..’असं ठाकरे म्हणाले.

दरम्यान, या टीकेला आता मनसेचे प्रवक्ते योगेश चिले (Yogesh Chile) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, उद्धवजी, सध्या शिवसेनेने हिंदूत्वाचं धोतर नाही तर हिंदूत्वाचा लेंगा घातला आहे… ज्याच्या नाड्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या (congress – NCP) हातात आहेत… जरा सांभाळुन रहा… तुमचे मित्र नॉटी (Naughty) आहेत… असं चिले यांनी म्हणत शेलक्या शब्दात उत्तर दिले आहे.

Previous Post
एलाॅन मस्क - ट्विटर

एलाॅन मस्क ‘ट्विटर’चे नवे मालक ! मोजले तब्बल ‘इतके’ अब्ज डॉलर

Next Post
dilip val;ase patil

नवनीत राणा यांच्या तक्रारीत वस्तुस्थिती नाही;लोकसभा अध्यक्षांना राज्यसरकार माहिती देईल – गृहमंत्री

Related Posts
"आपला देश व्यक्तीच्या भक्तीत...", गौतम गंभीर आडून आडून विराटवर घसरलाच

“आपला देश व्यक्तीच्या भक्तीत…”, गौतम गंभीर आडून आडून विराटवर घसरलाच

भारतीय संघ (Team India) हा जगातील क्रमांक एकचा क्रिकेट संघ मानला जातो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जागतिक क्रिकेटवर…
Read More
Sanjay Raut | 'नवीन गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय'; संजय राऊतांचं पीएम मोदींना जोरदार प्रत्युत्तर

Sanjay Raut | ‘नवीन गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय’; संजय राऊतांचं पीएम मोदींना जोरदार प्रत्युत्तर

Sanjay Raut | महाराष्ट्रात अनेक अतृप्त आत्मे फिरत आहेत. जे घर अस्थिर करतात. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील एका नेत्यांमुळे आज…
Read More
narayan rane

नितेश राणेंचा वादग्रस्त बॅनर लावणाऱ्यांना राणेंनी झापलं; म्हणाले…

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane)…
Read More