शिवसेनेचा हिंदुत्वाचा हुंकार : पहिल्याच कार्यकारणीच्या बैठकीत सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) शिवसेना (Shiv Sena) पक्ष मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

या कार्यकारिणीत पक्षाविरोधात कारवाई करणाऱ्यांसाठी एक तीन सदस्यांची समिती तयार करण्यात आल्याची महत्त्वाची माहिती मंत्री उदय सामंत यांनी बैठकीनंतर दिली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्य नेतेपदी कायम ठेवलं आहे. पक्षाचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना असणार आहेत. या बैठकीत मराठीला अभिजात दर्जा देण्याचा ठराव झालाय. तसेच 80 टक्के भूमिपुत्रांना नोकरी देण्याचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव झालाय.

शिवसेना कार्यकारिणी बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

1) चर्चगेट रेल्वे स्टेशनला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाव देणे.

2) राज्यातील भूमीपूत्रांना 80% नोकरी देणे. सर्व प्रकल्पात भूमीपूत्रांना 80% नोकरीमध्ये स्थान देणार.

3) मराठी भाषेला अभीजात भाषेचा दर्जा देणार.

4) स्वातंत्र्यवीर सावकरकरांना “भारतरत्न” देणे. लोकसभा गट नेते खासदार राहुल शेवाळे यांनी सर्वात प्रथम लोकसभेत ही मागणी केली होती.

5) UPSC आणि MPSC च्या मराठी मुलांना भक्कम पाठिंबा देणे.