Siddharth Mokale | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष भाजपच्या वाटेवर असल्याची शंका वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी उपस्थित केली आहे. वंचित बहुजन आघाडीला काही सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे 25 जुलै रोजी रात्री 2 वाजता 7 – बी, मोतीलाल नेहरू मार्ग, नवी दिल्ली येथे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटले होते की नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
तसेच पुढे बोलताना सिद्धार्थ मोकळे (Siddharth Mokale) म्हणाले, 5 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजता देवेंद्र फडणवीस हे मातोश्री बंगल्यावर आले होते. ते स्वतः गाडी चालवत आले होते. 2 तास त्यांची ठाकरेंसोबत चर्चा झाली. त्यानंतर 6 ऑगस्ट रोजी ठाकरे दिल्लीला गेले. जाताना त्यांच्या सोबत कोण कोण होते? दिल्लीला जाऊन तुम्ही कोणाकोणाला भेटलात? काय चर्चा झाली? हे राऊत आणि ठाकरे यांनी जाहीर करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
भाजप आणि महायुती मधील पक्ष हे काही आरक्षणवादी नाहीत, ते आरक्षण विरोधी आहेत हे जनतेला माहित आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आरक्षणवादी मतदारांनी मतदान केले आहे. गेल्या 5 वर्षातल्या घडामोडी बघता उद्या जर काही उलट सुलट राजकीय घटना घडल्या तर आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही ही माहिती उघड करीत आहोत, असेही सिद्धार्थ मोकळे म्हणाले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
पुण्याची वाहतूक कोंडी सोडविणे ही राज्य सरकारची जबाबदारी | CM Eknath Shinde
‘महाराष्ट्र विधानसभा २०२४ विजय संकल्प संमेलना’चे मुंबईत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
उद्योगस्नेही धोरणामुळे परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर | Uday Samant