सोलापूर जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांच्या निष्क्रियतेमुळे शिवसेनेची अधोगती; जिल्हाप्रमुख बदलण्याची मागणी

करमाळा – राज्य शासनाने जाहीर केलेल्या करमाळा तालुका (Karmala taluka) संजय गांधी निराधार योजनेच्या समितीमध्ये एकाही शिवसैनिकाला संधी मिळाली नाही हे धनंजय डिकोळे (Dhananjay Dikole) यांचे अपयश असून केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेनेचा वापर करणाऱ्या धनंजय डिकोळे यांना तात्काळ पदमुक्त करावे अशी मागणी शिवसेनेच्या (Shivsena) बैठकीत करण्यात आली

या बैठकीसाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, युवा सेनेचे शहर प्रमुख विशाल गायकवाड, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्रियंका गायकवाड, शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष संजय शीलवंत, माजी उपशहर प्रमुख राजेंद्र काळे, शिवसेनेचे युवा नेते डॉक्टर अमोल घाडगे, युवा सेने उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, उप शहर प्रमुख सागर काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते

यावेळी जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी दोन वर्षात एकदाही करमाळा दौरा केला नाही. शिव संपर्क मोहिमेची (Shiva Sampark Mohim) सभासद नोंदणी फॉर्म सुद्धा पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक दिले नाहीत. केवळ कुर्डूवाडी नगरपालिका (Kurduwadi Municipality) व स्वतःचा विकास डोळ्यासमोर ठेवून राजकारण करत असल्यामुळे करमाळा तालुका शिवसेना संघटना खिळखिळी झाली आहे असा आरोप करण्यात आला.

शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची दिशाभूल करून खोटे अहवाल द्यायचे व वेळ मारून न्यायची यात तरबेज असलेल्या यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या दोन्ही तालुक्यात शिवसेना नावापुरती राहिली आहे. टेंभुर्णी (Tembhurni) येथील शिवसेनेचे नेते संजय कोकाटे हे आपल्या पुढे जातील हे ओळखून त्यांना पद्धतशीर साईडला करून ठराविक वर्षानुवर्षे खुर्चीला चिटकून असलेल्या पदाधिकाऱ्यांना खालच्या पदावर ठेवून स्वतःची खुर्ची शाबूत ठेवत आहेत असा देखील आरोप यावेळी करण्यात आला.

कुर्डूवाडी शहरातून नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला 8 ते 9 हजार मते मिळतात मात्र विधानसभेच्या निवडणुकीला कुर्डूवाडी शहरातून शिवसेनेच्या उमेदवाराला केवळ दोन हजार मते मिळतात हा गेल्या तीन पंचवार्षिक चा इतिहास आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या (Sanjay Gandhi Niradhar Yojana) करमाळा तालुक्याच्या कमिटीमध्ये एकाही शिवसैनिकाला संधी मिळाली नाही हे पक्षाचे दुर्दैव असून याला सर्वस्वी जबाबदार धनंजय डिकोळे आहेत असा आरोप या बैठकीत शिवसैनिकांनी केला.